E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
डॉक्टरकडून ५० जणांची हत्या; मृतदेह मगरींना खाण्यास दिले
Samruddhi Dhayagude
23 May 2025
नवी दिल्ली : टॅक्सी आणि मालमोटार चालकांची हत्या करून त्यांचे मृतदेह मगरींना देणार्या डॉक्टरला दिल्ली पोलिसांनी राजस्तानातील दौसा येथील एका आश्रमातून अटक केली. तिथे तो पुजारी म्हणून राहत होता.
देवेंद्र शर्मा (वय ६७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आयुर्वेदचा डॉक्टर असलेला हा देवेंद्र त्याच्या सहकार्यांसह टॅक्सी किंवा मालमोटार चालकांना बनावट ट्रिपसाठी बोलावून त्यांची हत्या करायचा आणि त्यांची वाहने विकायचा. यानंतर कोणताही पुरावा शिल्लक राहू नये म्हणून त्यांचे मृतदेह उत्तर प्रदेशातील कासगंज येथील हजारा कालव्यातील मगरींना खाऊ घालायचा.
देवेंद्र याच्यावर ५० हत्यांचा आरोप आहे. २००२ ते २००४ दरम्यान त्याने या हत्या केल्या असून, तो तिहार तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. परंतु, ऑगस्ट २०२३ मध्ये पॅरोलवर सुटल्यानंतर तो फरार झाला. दिल्ली, राजस्तान आणि हरयानामध्ये सात वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. गुडगाव न्यायालयाने त्याला मृत्युदंडाची शिक्षाही सुनावली होती. त्याच्यावर हत्या, अपहरण आणि दरोड्यासारखे २७ हून अधिक गुन्हे दाखल आहेत.
यापूर्वी १९९८ ते २००४ दरम्यान बेकायदेशीर मूत्रपिंड प्रत्यारोपण रॅकेट चालवल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. १९९८ मध्ये डॉ. अमितने दिल्ली, गुरुग्राम आणि इतर अनेक शहरांमध्ये बेकायदेशीर मूत्रपिंड प्रत्यारोपणाचे केंद्र सुरू केले होते. अमितने देवेंद्रला यात ओढले. किडनी प्रत्यारोपणामागे तो देवेंद्रला ५ ते ७ लाख रुपये द्यायचा. देवेंद्रने बिहार, बंगाल आणि नेपाळमधील गरीब लोकांना आमिष दाखवून डॉ. अमितकडे न्यायचा. देवेंद्रच्या मदतीने अमितने १९९८ ते २००४ या काळात १२५ हून अधिक किडनी प्रत्यारोपण केल्या आहेत.
Related
Articles
अजित पवार यांच्या भाषणावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ
15 Jun 2025
महाराष्ट्रात पावसाचे आठ बळी
16 Jun 2025
नगरविकास विभागाने मागविली टीडीआरची माहिती
20 Jun 2025
मुशफिकरू रहिम,नजमुल होसिन शॅन्टो यांची शतके
18 Jun 2025
प्रसिद्ध कथक नृत्यांगना विदुषी मंगला भट्ट यांचे निधन
16 Jun 2025
ठेवींवरील व्याज घटणार

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
ठेवींवरील व्याज घटणार
4
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
5
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
6
इंद्रायणीवरील लोखंडी पूल कोसळला