प्रसिद्ध कथक नृत्यांगना विदुषी मंगला भट्ट यांचे निधन   

कोल्हापूर : प्रसिद्ध कथक नृत्यांगना विदुषी मंगला भट्ट यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी अल्पशा आजाराने आज (सोमवार) हैदराबाद  येथे निधन झाले.त्या मूळच्या कोल्हापूरच्या असून त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 
 
विदुषी मंगला भट्ट (पूर्वाश्रमीच्या मंगला कुलकर्णी) यांनी दिल्ली कथक केंद्रामध्ये पंडित दुर्गालालजी यांच्याकडून कथकचे शिक्षण घेतले. मंगलाताईंच्या कथक नृत्यप्रतिभेचे देश विदेशातून कौतुक झाले आहे. प्रतिभावंत नृत्यांगना म्हणून त्यांचे नावलौकिक होते. केंद्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कारासोबतच तेलंगणा, आंध्रप्रदेश इत्यादी राज्यातील महत्त्वाच्या पुरस्कारांनी त्यांचा सन्मान झाला होता. मंगलाताई कोल्हापूरशी असलेले ऋणानुबंध जपण्यासाठी गेली काही वर्षे गार्गीदेवी निंबाळकर यांच्या माध्यमातून कथकचे प्रशिक्षण देत होत्या. पंडित बिरजू महाराज यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित राघवराज भट्ट हे त्यांचे पती आहेत. त्यांच्या पश्चात पती, मुलगा आणि सून आहेत.  

Related Articles