मुशफिकरू रहिम,नजमुल होसिन शॅन्टो यांची शतके   

गॉले : श्रीलंका आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी सामन्यासह आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या चौथ्या हंगामाला सुरुवात झाली. या सामन्यात बांगलादेशाच्या संघाने कसोटीच्या पहिल्या डावात ९० षटकांत २९२ धावा केल्या. यावेळी ३ फलंदाज बाद झाले. या सामन्यात नजमुल होसिन शॅन्टो याने २६० चेंडूत १३६ धावा केल्या. यावेळी १४ चौकार आणि १ षटकार मारला. 
 
तर मुशफिकरू रहिम याने १०५ धावा केल्या आणि यावेळी त्याने ५ चौकार मारले. त्याच्यामुळे बांगलादेशाच्या संघाला दुसरे शतक मिळाले. तर अवांतर ८ धावा संघाला मिळाल्या. यावेळी श्रीलंकेच्या गोलंदाजांपैकी असिथा फर्नांडो याने १ फलंदाज बाद केला. तर थारिंन्दू याने २ फलंदाज बाद केले. तर दुसरीकडे भारतीय संघ  २० जून पासून इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतून नव्या चक्राची सुरुवात करेल. या दरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये मोठा बदल होणार असल्याची गोष्ट चर्चेत आली आहे. पाच दिवस खेळवण्यात येणारा कसोटी सामना ४ दिवसांचा करण्यात येणार आहे. 
 
सध्याच्या घडीला जी माहिती समोर येतीये त्यानुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद २०२७-२९ च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या हंगामात ४ दिवसीय कसोटी सामन्यांचा नियम लागू करणार आहे. आता हा बदल हा या स्पर्धेत सहभागी असणार्‍या संघांसाठी सरसकट नसेल. फक्त छोट्या देशातील क्रिकेट संघांसाठी चार दिवसीय कसोटी सामन्याला मंजूरी देण्यात येणार असल्याचे बोलले जाते. दुसर्‍या बाजूला भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया हे नियमित पाच दिवसीय कसोटी सामनाच खेळतील.
 
मागच्या आठवड्यात लॉर्ड्सच्या मैदानात रंगलेल्या थढउ फायनलच्या दरम्यान कसोटीतील नव्या बदलासंदर्भात चर्चा करण्यात आलीये. आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी २०२७-२९ च्या थढउ चक्रात चार दिवसीय कसोटी सामने खेळण्याच्या मुद्याला सहमती दर्शवली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या पाचव्या हंगामात चार दिवसीय कसोटी सामने पाहायला मिळतील. पण या दरम्यान भारत विरुद्ध इंग्लंड,  भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड विरुद्ध  ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील सामना हा मात्र पाच दिवसांचा राहिल, अशी चर्चा देखील झाल्याचे समजते. 
 
आयसीसीने याआधी २०१७ मध्ये द्विपक्षीय लढतींसाठी चार दिवसीय कसोटी सामन्याला मंजूरी दिली होती.  २०१९ आणि २०२३ मध्ये इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात हा प्रयोग झाला. झिम्बाब्वेनंही चार दिवसीय कसोटी सामना खेळला आहे. छोट्या देशांनीही कसोटीला पसंती द्यावी यासाठी हा नियम लागू करण्यात येणार आहे. कमी केलेला दिवस भरून काढण्यासाठी प्रत्येक दिवशी ९० षटकांऐवजी ९८ षटकांचा खेळ अपेक्षित आहे. आंतरारष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून अधिकृतरित्या याची घोषणा कधी होणार ते पाहण्याजोगे असेल.

Related Articles