महाराष्ट्रात पावसाचे आठ बळी   

किनारी जिल्ह्यांसाठी सतर्कतेचा इशारा

मुंबई : मुसळधार पावसाने वीज कोसळल्याने राज्यात विविध भागांत आठ जणांचा मृत्यू झाला. तर १० जण जखमी झाले आहेत. मुंबई, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, संभाजीनगर, नंदुरबार आणि अमरावती येथे या घटना घडल्या आहेत. हवामान विभागाने रत्नागिरी आणि रायगड या किनारी जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाट  माथ्यावर ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 
 
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलआणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या पथकांना बचाव कार्यासाठी तैनात करण्यात आले आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन अहवालानुसार, रविवारी सकाळी ११ वाजता संपलेल्या २४ तासांत रत्नागिरीमध्ये सर्वाधिक ८८.१ मिलीमीटर, रायगडमध्ये ६५.३, सिंधुदुर्गात ४३.८, ठाण्यात २९.६ आणि यवतमाळमध्ये २७.५ मिलिमीटर पाऊस पडला.
 
कोकणातील प्रमुख नद्यांपैकी, रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीपेक्षा वाहत आहे आणि पाण्याची पातळी वाढल्यास तिच्या काठावरील खेड, अलसुरे, चिंचघर आणि प्रभुवाडी गावे प्रभावित होऊ शकतात, असे आपत्ती व्यवस्थापन अहवालात म्हटले आहे.
 

Related Articles