कसोटी क्रिकेटमध्ये आयसीसीचे नवे नियम   

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कसोटी सामन्यांमध्ये स्लो ओव्हर रेटसाठी स्टॉप क्लॉक नियम लागू केला आहे. 2025-27 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलच्या सुरुवातीपासून हा नियम लागू करण्यात आला आहे. याशिवाय एकदिवसाच्या क्रिकेटमध्येही 2 जुलै पासून काही नवे नियम लागू होणार आहेत. आयसीसीने आता टेस्ट क्रिकेटमध्ये स्टॉप क्लॉक नियम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. वनडेत हा नियम आधीपासूनच सक्रीय आहे. या नियमानुसार, क्षेत्ररक्षण करणार्‍या संघाला षटक संपल्यावर एका मिनिटांच्या आत दुसरे षटक टाकण्यासाठी तयार रहावे लागेल. जर वेळ पाळली नाही तर मैदानातील पंच क्षेत्ररक्षण करणार्‍या संघाला दोन वेळे ताकीद देतील. त्यानंतरही चूक झाली तर पाच धावांची पेनल्टी लागू होईल. 
 
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजूनही चेंडूवर लाळ/थुंकी लावण्यावर बंदी आहे. बर्‍याचदा चेंडू स्विंग करण्यासाठी मदत मिळवण्याशिवाय लाळ/थुंकीच्या वापरासह चेंडू खराब करुन नवा चेंडू उपलब्ध करुन घेण्याचा डावही खेळला जायचा. पण आता तसं करता येणार नाही. चंडू बदलायचा की नाही यासंदर्भातील निर्णय घेण्याचा अधिकार हा पंचाकडे असेल. चेंडू ओला किंवा खूपच खराब झाला असेल तरच दुसरा चेंडू घेण्यात येईल. अंपायर्संना मिळाली ही एक पॉवरच आहे. बर्‍याचदा फिल्डरने घेतलेला कॅच क्लियर झालाय का? यासाठी टेलिव्हिजन अंपायरची मदत घेतली जाते. या परिस्थितीत सर्वात आधी नो बॉल आहे का ते तपासले जाते. 
 
जर नो बॉल असेल तर कॅच न पाहता फलंदाजाला नाबाद घोषित करत संघाला एक धाव दिली जायची. पण आता कॅच क्लियर झालाय की, नाही तेही पाहिले जाईल. जर कॅच झाला असेल तर नो बॉलच्या स्वरुपात फक्त एक धाव मिळेल. याउलट कॅच ड्रॉपच्या परस्थितीत फलंदाजांनी काढलेल्या धावाही संघाच्या खात्यात जमा होतील.फलंदाज जाणीवपूर्वक शॉर्ट रन घेताना पकडला गेला तर फलंदाजी करणार्‍या संघाला पाच धावांची पेनल्टीचा नियम आहे.याशिवाय आता अशी धाव घेतल्यावर कोणता फलंदाज स्ट्राइकवर हवा ते ठरवण्याचा अधिकार क्षेत्ररक्षण करणार्‍या संघाला देण्यात येणार आहे. 
 
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये फुल टाइम रिप्लेसमेंटसंदर्भातील नियमही लागू करण्यात येणार आहे. बदली खेळाडूसाठी ’कन्कशन सब्स्टीट्यूट’ प्रमाणे जशास तसा खेळाडू निवडावा लागेल. हॅमस्ट्रिंग किंवा छोट्या दुखापतीसाठी फुलटामइम रिप्लेसमेंटचा नियम लागू होणार नाही. मैदानातील पंच दुखापत पाहून यासंदर्भात निर्णय घेतली. देशांतर्गत क्रिकेटमध्ये हा नियम सक्रीय करावा की, नाही हे त्या त्या देशावर अवलंबून असेल.

Related Articles