फिरत्या दवाखान्याला पालखी सोहळ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद   

चाकण, (वार्ताहर) : हंट्समन सोल्युशन्स इंडियाच्या वतीने संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या काळात भाविकांना मोफत औषधउपचार व आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. पुणे शहरात झालेल्या या पालखी सोहळ्यात २ हजार ३५१ वारकरी भक्तांनी या सेवेचा लाभ घेतला. या उपक्रमांतर्गत या आरोग्य चिकित्सालयाची सेवा दर रविवारी आळंदी आणि देहू येथे वारकरी व भाविकांना देण्यात येते.
 
हंट्समन कंपनीने सीएसआर निधीतून सुरू केलेली ’फिरते आरोग्य चिकित्सालय’ ही सेवा चाकण परिसरातील दुर्गम १८ गावांतील सुमारे ५५ हजार लोकांना मोफत प्राथमिक वैद्यकीय सेवा देत आहे.
 
आरोग्य सेवा वाहन विशेषतः दुर्गम गावांत आरोग्य सेवा उपलब्ध नाहीत किंवा अत्यंत मर्यादित आहेत. या भागात जाऊन आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहे. याशिवाय हंट्समन कंपनी ग्रामीण भागात आरोग्य, शिक्षण, ग्रामीण विकास आणि कौशल्य विकासाच्या सुविधा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे.परिसरातील शाळांतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत आहे, अशी माहिती  राजकुमार दळवी यांनी दिली.
 

Related Articles