युद्धविरामाचे जगभरातून स्वागत   

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धबंदीचे स्वागत जगभरातून मंगळवारी करण्यात आले. अमेरिकेसह तिन्ही देशांनी एक चांगला निर्णय घेतला आहे. त्यामुळे परिसरातील मोठे युद्ध टळले आहे, अशी प्रतिक्रिया जागतिक नेत्यांनी व्यक्त केली. 

कतार

अमिर शेख तमीम बिन हमद अल थानी म्हणाले की, अमेरिकेच्या विनंतीवरून त्यांचा देश युद्धबंदीमध्ये मध्यस्थी करण्यासाठी इराणशी संपर्क साधत आहे.
त्यांनी सांगितले की कतार युद्धबंदीचे स्वागत करतो परंतु उल्लंघनाच्या तक्रारींबद्दल चिंता व्यक्त करतो.

इजिप्त

इजिप्तच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, दोन्ही देशांमधील लष्करी संघर्ष संपवण्यासाठी आणि प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.

लेबनॉन

लेबनॉनचे पंतप्रधान नवाफ अब्दल्लाह सलीम सलाम म्हणाले की, इस्रायल-इराण मोठ्या युद्धात ओढले जाण्यापासून वाचले आहेत.

जॉर्डन

जॉर्डनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सुफयान कुदाह यांनी युद्धबंदी कराराचे पालन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी गाझामध्ये आता युद्धबंदीचे आवाहनही केले.

सौदी अरेबिया

सौदी अरेबियाने म्हटले आहे की  डोनाल्ड यांच्या घोषणेचे स्वागत करतोदोन्ही पक्षांमध्ये युद्धबंदी कराराचा मसुदा तयार झाल्याचा मला आनंद आहे.

रशिया

परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह म्हणाले की, इस्रायल आणि इराणमधील युद्धबंदीच्या बाजूने रशिया आहे. परंतु ती टिकेल की नाही हे सांगणे कठीण आहे. आताच अंतिम निष्कर्ष काढणे खूप कठीण आहे.
 
क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी पत्रकारांना सांगितले की जर खरोखरच युद्धबंदी झाली असेल तर ती स्वागतार्ह असू शकते, तसेच मॉस्कोला आशा होती की ही एक शाश्वत युद्धबंदी असेल.

चीन

राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि सुरक्षिततेचे रक्षण करण्याच्या इराणच्या वचनबद्धतेचे चीन समर्थन करतो आणि त्या आधारावर खरा युद्धबंदी साध्य करता येईल अशी आशा आहे, असे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी  सांगितले. चीनच्या मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की यी यांनी सर्व पक्षांनी समान आधारावर संवाद पुन्हा सुरू करावा.बीजिंगने खरी युद्धबंदी प्रत्यक्षात आणण्यास पाठिंबा दिला आहे.

युरोपियन महासंघ 

युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डेर लेयन म्हणाल्या की,  महासंघ निणर्र्याचे स्वागत करतो. प्रदेशात स्थैर्य निर्माण करण्यासाठी उचलले एक पाउल आहे.इराणने विश्वसनीय राजनैतिक प्रक्रियेत गांभीर्याने सहभागी व्हावे. 

फ्रान्स

इराणने आणखी वेळ दवडू नये. तातडीने वाटाघाटीला प्रारंभ करावा, असे आवाहन फ्रान्सने केले. त्यामुळे  अणु आणि बॅलिस्टिक कार्यक्रमांशी आणि  अन्य  अस्थिर कारवायांशी संबंधित सर्व चिंता दूर होतील असा करार व्हावा, असे युरोप आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने निवेदनात म्हटले आहे.

जर्मनी

मी अमेरिकन अध्यक्ष ट्रम्प यांच्या आवाहनाचे स्वागत करतो, अशी पोस्ट जर्मनीचे चान्सलर फ्रेडरिक मर्झ यांनी समाज माध्यमांवर टाकली आहे. इराण आणि इस्रायल यांनी निर्णयाची अंमलबजावणी करावी.े कतार आणि परिसरातील देशांनी युद्धाचा भडका उडणार नाही, याची दक्षता घेतल्याबद्दल त्यांचे मी आभार मानतो.
 

Related Articles