E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
हरी नामाच्या गजरात माउलींच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात आगमन
Samruddhi Dhayagude
01 Jul 2025
धर्मपुरीत पालकमंत्री गोरे यांनी केले पालखीचे स्वागत
सोलापूर, (प्रतिनिधी) : आषाढी वारी सोहळ्यात विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन आळंदी येथून निघालेल्या संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे सोमवारी सोलापूर जिल्ह्यातील धर्मपुरी येथे आगमन झाले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पालखीचे स्वागत करून माउलीच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले.
धर्मपुरी येथे पालखी स्वागतासाठी पालकमंत्री गोरे यांच्यासह खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील, आमदार उत्तमराव जानकर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, अतिरिक्त जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकुर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, माजी आमदार राम सातपुते, उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, अमित माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले उपस्थित होते. माउलींच्या पालखी स्वागतापूर्वी सोहळ्यातील नगारा व अश्वाचे पूजन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
पालखी स्वागतानंतर पालकमंत्री गोरे व प्रशासनातील अधिकारी व लोकप्रतिनिधींनी हरी नामाचा गजर करीत पालखी सोहळ्याबरोबर काही अंतर चालत गेले. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे व त्यांच्या पत्नी सोनिया यांनी फुगडी खेळत रामकृष्ण हरी, विठ्ठल विठ्ठल नामाचा जयघोष केला, तसेच पालकमंत्री गोरे व माजी आमदार राम सातपुते यांनीही फुगडी खेळली.
सातारा प्रशासनाच्या वतीने निरोप
सोलापूर जिल्ह्यात माउलींच्या पालखीचे आगमन सकाळी १० वाजता धर्मपुरी बंगला येथे झाले. तत्पूर्वी, सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी यासणी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, फलटणचे उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांच्यासह जिल्हा प्रशासनातील अधिकार्यांनी माउलींच्या पालखीला भक्तिमय वातावरणात भावपूर्ण निरोप दिला.
टाळी वाजवावी, गुढी उभी राहावी
वाट ती चालावी पंढरीची या संत वचनानुसार टाळ मृदंगाचा गजर आणि मुखाने जय हरी विठ्ठल... जय हरी विठ्ठल, ज्ञानोबा... तुकारामचा जयघोष करीत वारकरी पालखी सोहळ्यात तल्लीन झाले होते. प्रत्येक वारकर्याच्या चेहर्यावर विठ्ठलाच्या दर्शनाची आस दिसत होती. विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने वारकरी पंढरीचे अंतर एक एक पाऊल जवळ करीत होता.
दर्शनासाठी भाविकांची गर्दी
सोलापूर जिल्ह्यातील पालखी प्रवेशानंतर माउलींची पालखी पाटबंधारे विभागाच्या विश्रामगृह येथे विसाव्यासाठी थांबली असता पालखीच्या दर्शनासाठी परिसरातील वारकरी भाविक व ग्रामस्थांनी अलोट गर्दी केली होती. धर्मपुरी येथे विसावा घेतल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील पहिल्या मुक्कामासाठी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माउलींची पालखी नातेपुतेकडे मार्गस्थ झाली.
Related
Articles
संसदेतील गदारोळ कायम
24 Jul 2025
‘या’ राज्यात सापडला तब्बल २००० वर्षांपूर्वीचा बौद्ध स्तूप
23 Jul 2025
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा सत्कार
25 Jul 2025
अमेरिकेसोबत व्यापार करार काळजीपूर्वक करा : रघुराम राजन
19 Jul 2025
उपमुख्यमंत्री शिवकुमारांचे नाव घेण्यास मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा नकार
21 Jul 2025
कंटेनरला दुसऱ्या कंटेनरची पाठीमागून भीषण धडक, चालक गंभीर जखमी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)