कर्जमाफीपासून सरकार पळ का काढते : शेट्टी   

सातारा, (प्रतिनिधी) : शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करू, असे महायुतीकडून निवडणुकीच्यावेळी आश्वासन देण्यात आले होते, मग आता ते पळ का काढते? उद्योजकांची कर्जे माफ करताना कुठली समिती लावली नाही, मग शेतकर्‍यांच्या कर्जमाफीसाठीच नियम, अटी का हव्यात? बुलेट ट्रेन व मेट्रोसाठी पैसे आहेत, मग शेतकर्‍यांसाठी का नाही? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला. 
 
शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, राजू शेळके, अनिल पवार उपस्थित होते. शेट्टी म्हणाले, ’मॉन्सूनपूर्व पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले असून, तात्काळ पंचनामे व्हावेत. सरकारने नुकसानीच्या निकषांतही बदल करणे गरजेचे आहे. पूर नियंत्रण, अलमट्टीची पाणीपातळी, नुकसान भरपाई व पूल अडथळ्यांवर सरकारने ठोस भूमिका न घेतल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करेल, असा इशाराही शेट्टी यांनी दिला.
 

Related Articles