व्हॉट्सऍप कट्टा   

जग कसं अजब आहे!
देवावर प्रेम सर्वांनाच आहे.
...पण ’त्याच्या घरी’ जायची 
घाई मात्र कुणालाच नाही.
आपल्या घरात सर्वांनाच देव हवा.
...पण त्याच्या घरी आपण जायच्या
विचाराने मात्र मनात धडकी भरते.
देव आपल्या घरी आला म्हणजे,
’सण, उत्सव आणि आनंद.’
आपण त्याच्या घरी गेलो म्हणजे,
’दुःख, शोक.’
देव आपल्या घरी यावा म्हणून आटापिटा.
आपण त्याच्या घरी जाऊ नये 
म्हणूनही आटापिटा.
देवाघरून येणं म्हणजे ’जन्म’.
देवाघरी जाणं म्हणजे ’मृत्यु’.
दोन्हीही अटळ आहेत.
पण ह्या दोघांमधली जी ’गंमत’ आहे,
त्यालाच तर ’आयुष्य’ असे नाव आहे.
 
- व. पु. काळे
--
आकाशातील ग्रह पृथ्वीवरील माणसावर परिणाम करतात की नाही  ते माहीत नाही... परंतु पृथ्वीवरील माणसे एकमेकांबद्दल जे ग्रह करून घेतात ते मात्र माणसाच्या जीवनावर निश्चित परिणाम करतात...
--
बाहेर करतो साई-साई, घरात रडते तुझी आई.
सर्वांना करतो साईराम, आईला करायला लावतो घरकाम.
मंदिरात लावतो साईला दिवा, घरात देतो आईला शिव्या.
आईचे आटवतो रक्त म्हणे मी साईचा भक्त.
जो आईचा नाही झाला तो साईचा काय होणार.
चांगले सत्कर्म केले तरच साई तुमच्या आईकडे लक्ष देतील,
तरच साई तुमच्याकडे लक्ष देतील.
--
अकबर बादशहा... अरे बिरबल मला सांग आपल्या राज्यातील सर्वांत जास्त काम करणारी गृहिणी कशी ओळखायची?                        
बिरबल... महाराज मी सर्वांना बोलावून घेतो व मग ठरवू.     
बिरबल सर्वांना बोलावतो व एकीचा हात पकडून म्हणतो महाराज हीच ती...
महाराज ...  कशावरून?              
बिरबल ... महाराज मी हिचा मोबाईल चेक केला. हिच्या मोबाईलची बॅटरी ९८ टक्के आहे.

Related Articles