ड्रोन, बुलटेप्रूफ जॅकेट, हॅल्मेटसह शस्त्रांचे करार   

दहशतवादाविरोधात प्रखर लढा 

नवी दिल्ली : सीमेपलीकडचा दहशतवाद रोखण्यासाठी आणि भारतीय लष्कराला बळ देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. त्या अंतर्गत २ हजार कोटी रुपये मंजूर केले असून १ हजार ९८० कोटी रुपयांचे १३ शस्त्र करार देखील केले आहेत.लष्करासाठी आवश्यक ड्रोन शोध आणि प्रतिबंधक यंत्रणेचा समावेश आहे. जम्मू आणि काश्मीरमधील पाकिस्तान पुरस्कृत दहशताद्यांचा खात्मा करण्यासाठी प्रामुख्याने शस्त्रास्त्रांंचे करार केले आहेत.
 
पहलगाम दहतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने आक्रमक करावाई करुन पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते.यानंतर संरक्षण व्यवस्था अधिक भक्कम करण्यासाठी पावले उचण्यात आली. त्यामध्ये कमी उंचीवरील रडार यंत्रणा, लघु पल्ल्याची हवाई संरक्षण यंत्रणा, मानवरहित विमाने आणि हवाई मार्गे शस्त्रसाठे हलविण्याच्या यंत्रणेचा समावेश आहे. विविध प्रकारची ड्रोन, बुलेटप्रूफ जॅकेट आणि बॅलिस्टिक हेल्मेट यांची तातडीने खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी मंत्रालयाने २ हजार कोटी मंजूर केले असून त्यापैकी १ हजार ९८१ कोटींचे १३ करार केले आहेत. ही शस्त्रे  लष्कराला तातडीने उपलब्ध करुन दिली जातील. त्याद्वारे दहशतवादाविरोधातील लढा अधिक वेगवान होण्यास मदत मिळणार आहे. 

Related Articles