E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
पतीचा खून करणार्या महिलेस अटक
Samruddhi Dhayagude
04 Jul 2025
पुणे : चारित्र्यावर संशय घेऊन पतीकडून सुरू असलेल्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून पतीचा खून करणार्या पत्नीला आंबेगाव पोलिसांनी वर्षभरानंतर अटक केली. डोक्यात व शरिरावर ठिकठिकाणी मारहाण करून पतीचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करून महिलेला अटक करण्यात आली.
वृषाली अजेंटराव (वय २४, साहिल हाईटस, जांभुळवाडी, आंबेगाव खु.) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. तर अभिषेक अजेंटराव (वय २३) असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. आंबेगाव परिसरात १० जुलै २०२४ रोजी दुपारी एक वाजता ही घटना घडली होती. पोलीस उपनिरीक्षक मोहन कळमकर यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दिली होती.
अभिषेक अजेंटराव हा एका खासगी कंपनीत काम करत होता. खुनाचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात त्याला अटक झाली होती. तो मागील वर्षी कारागृहातून सुटला. घरी आल्यानंतर तो वृषाली हिच्या चारित्र्यावर वारंवार संशय घेऊन तिला मारहाण करत होता. वृषाली काम करत असलेल्या ठिकाणी १० जुलै २०२४ रोजी अभिषेक याने चारित्र्याच्या संशयावरून तिला मारहाण केली. या प्रकाराने वैतागलेल्या वृषाली हिने त्याच्या डोक्यात कठीण वस्तूने आघात केला. तसेच, त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच, भारती विद्यापीठ पोलिसांनी मृतदेह उत्तरीय वैद्यकीय तपासणीसाठी पाठवला. मात्र, डॉक्टरांना मृत्युचे नेमके निदान करता आले नाही. त्यांनी व्हिसेरा राखून ठेवला. तसेच, पोलिसांनी अकस्मात मृत्यु झाल्याची तेव्हा नोंद केली होती.
‘घटना घडली तेव्हा मी घरी नव्हते. पडून जखमी झाल्याने अभिषेकची मृत्यू झाला असावा’, असे वृषालीचे म्हणणे होते. अभिषेकवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा यापूर्वी दाखल असल्याने नेमका कोणत्या कारणावरुन आणि कसा मृत्यू झाला, हे समोर येत नव्हते. आंबेगाव पोलीस ठाण्याची स्थापना झाल्यानंतर हे प्रकरण आंबेगाव पोलिसांकडे हस्तांतरीत करण्यात आले. नुकताच याबाबतचा व्हिसेराचा अहवाल आला. मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर पोलिसांनी वृषाली अजेंटराव हिच्याकडे पुन्हा चौकशी केली. त्यात तिने आपणच मारल्याचे कबूल केले. पोलिसांनी तिला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, तिला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
Related
Articles
महिलांच्या बोगीत प्रवेश २ हजार ३२० पुरुषांना दंड
21 Jul 2025
धनकवडीत २० ते २५ वाहनांची दोघांकडून तोडफोड
23 Jul 2025
कोस्टलवर २३६ सीसीटीव्हीचा वॉच
22 Jul 2025
व्हॉट्सऍप कट्टा
21 Jul 2025
अहमदाबादमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांची आत्महत्या
21 Jul 2025
प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’चा बिहार विधानसभेवर मोर्चा
24 Jul 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)