कन्हैया कुमार निवडणूक लढवणार   

बिहार विधानसभा 

नवी दिल्ली : काँग्रेस नेते कन्हैया कुमार बिहारच्या विधानसभा निवडणुकीत उतरणार आहेत. पक्षाने सांगितले तर मी आगामी बिहार विधानसभा निवडणूक लढवेन, असे कन्हैया म्हणाले. यासाठी कन्हैया यांनी क्रिकेटचे उदाहरण दिले. कर्णधाराने मला सांगितले तर मी फलंदाजी करण्यास तयार आहे. क्रिकेट म्हणजे फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण आले. त्या सर्व जबाबदार्‍या खेळाडूंना पार पाडाव्या लागतात. त्याचप्रमाणे, राजकारणात निवडणूक लढवणे ही देखील एक जबाबदारी आहे. 

Related Articles