दहशतवाद्याच्या मालमत्तेवर टाच   

जम्मू आणि काश्मीर पोलिसांची कारवाई

जम्मू : जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी सोमवारी उधमपूर जिल्ह्यातील एका दहशतवाद्याच्या मालमत्तेवर टाच आणली. तो दहशतवादी कृत्यात सामील असल्याचे तपासात उघड झाल्याने काल कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
 
बेकायदा कृती प्रतिबंधक कायद्यानुसार मोहमद शफीकचे बसंतगढ येथील कदवाह गावातील २७३ चौरस फूट जमीन आहे. ती पोलिसांनी जप्त केली. बसंतगढचा परिसर दुर्गम असून तो जंगलाने वेढला आहे. तेथे दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये सातत्याने चकमकी उडत असतात.  शफीक  हा दहशतवादी कारवायांत गुंतल्याचे तपासात उघड झाले होते. कायद्याच्या कलम २४ अंतर्गत कारवाई करण्यात आली होती त्याच्याविरोधात पोलिसांनी  गुुन्हा दाखल केला होता. दरम्यान, शफीकला गेल्या वर्षी अटक केली होती.  अधिकार्‍यांनी सांगितले की, जमिनीची किंमत लाखो रुपयांच्या घरात आहे. ती जप्त केल्यामुळे ती आता कोणालाही विकता किंवा तिसर्‍या पक्षाला आता हस्तांतरीत करता येणार नाही. 
 

Related Articles