देशविरोधी कारवायांबद्दल ९७ जणांना अटक   

गुवाहाटी : आसामच्या वेगवेगळ्या भागातून देशविरोधी कारवाया केल्याच्या आरोपाखाली आणखी दोघांना अटक करण्यात आली. तर, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर या प्रकरणात आतापर्यंत ८७ जणांना अटक झाली आहे, असे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी सोमवारी सांगितले. 
 
सरमा यांनी ‘एक्स’ या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये म्हटले आहे की, तिनसुकिया आणि नागाव जिल्ह्यातून प्रत्येकी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. हिंदूविरोधी घटकांवर कारवाई सुरूच असून ९७ देशद्रोही आणि हिंदूविरोधी गुन्हेगार आता तुरुंगात आहेत.तिनसुकिया येथील अटक केलेल्या व्यक्तीने समाज माध्यमावर हिंदू धर्माबद्दल आक्षेपार्ह मजकूर शेअर केला होता, तर नागाव येथील आरोपीने भगवान राम यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी केली होती, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
 
याआधी, एआययूडीएफ आमदार अमिनुल इस्लाम यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. पहलगाम हल्ल्यानंतर त्यांनी पाकिस्तानचे समर्थन केले होते. या प्रकरणात जामीन मिळाल्यानंतर त्यांना पुन्हा राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत (एनएसए) ताब्यात घेण्यात आले. २ मे रोजी सरमा यांनी पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर ’पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍यांचे पाय तोडण्याची धमकी दिली होती.

Related Articles