शरद पवार यांना सोडून मोठी चूक केली..   

चिपळूण : शरद पवार यांना सोडून चूक केली, असे विधान ठाकरे शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी केले आहे. जाधव यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.जाधव हे सुरुवातीला शिवसेनेत होते. पक्षनेतृत्वाशी मतभेद झाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर, त्यांनी पुन्हा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. 
 
जाधव यांनी अलीकडेच एका मुलाखतीत पवार यांना सोडून शिवसेनेत दाखल होणे, ही माझी आयुष्यातील सर्वांत मोठी चूक होती, असे म्हटले होते. याबाबत विचारले असता जाधव म्हणाले की, पवार यांची साथ सोडण्याचा निर्णय चुकीचा होता. त्यामुळे मला काही चुकल्यासारखे वाटते, असा अजिबात त्याचा अर्थ नाही. मी त्याचे स्पष्टीकरण दिलेले आहे. मी तो निर्णय घेतला तो चुकीचा होता, हे मी स्पष्टपणे बोललो आहे. तेथे मी लपूनछपून काही बोललो नाही. पण, याचा अर्थ मला त्याची खंत वाटते, असे नाही, अशी कबुली त्यांनी दिली.

Related Articles