पीएमपीएमएल चालकाकडून प्रवाशाला मारहाण   

कवठे येमाई,(वार्ताहर) : शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चौकात एका पीएमपीएमएल बसच्या चालकाने पुणे ते तळेगाव ढमढेरे मार्गावरील एका प्रवाशाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. बस चालकावर कारवाईची मागणी नागरिक व प्रवासी करत आहेत.
 
शिक्रापूर (ता. शिरुर) येथे पुण्याहून प्रवासी घेऊन आलेल्या बसमधील प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार बसवरील चालक मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने तसेच अपघात होईल अशा पद्धतीने बस चालवत असल्याने प्रवासी चौकात उतरले. यावेळी काही प्रवासी बस चालकाला जाब विचारत असताना बसचालकाने कमरेचा पट्टा काढून एका प्रवाशाला मारहाण सुरू केली. दरम्यान दुसर्‍या बाजूने आलेल्या बसच्या चालक व वाहकांनी देखील चालकाला पकडून बसमध्ये बसण्यास सांगितले, मात्र चालक नशेमुळे कोणाचेही ऐकण्याच्या मन:स्थितीमध्ये नव्हता. बसचालकाच्या कृत्याचा धक्कादायक व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत असल्याने बेजबाबदार बस चालकावर कारवाईची मागणी केली जात आहे.

Related Articles