अणुबाँबच्या निर्मितीनंतर इराण भारतासाठी धोकादायक   

माजी लष्करांच्या माजी अधिकार्‍यांचे मत

पुणे : गेल्या दहा दिवसांपासून सुरू असलेल्या इराण-इस्त्रायल युध्दात आता अमेरिकेने देखील उडी घेतली आहे. इराणच्या अणुभट्टयांवर हवाई हल्ले करून अमेरिकेने इराणचे प्रचंड नुकसान केले. त्यामुळे इराणनेही आक्रमक पवित्रा घेतला असून या हल्ल्याचा बदला घेतला जाईल, असा इशारा इराणने अमेरिकेला दिला आहे. मुळात इराण-इस्त्रायल युध्दात अमेरिका पडायला नको होती. इराणमधील तेलाचे दर अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यामुळे अनेक देश इराणचे तेल आयात करीत आहेत. त्यामुळे अमेरिकेचे आर्थिक नुकसान होत आहे.  तसेच, अणुबॉम्बच्या निर्मितीनंतर इराण भविष्यात भारताला घातक ठरू शकेल, अशी भिती अमेरिकेला आहे. अशा अनेक प्रतिक्रिया लष्करांच्या माजी अधिकार्‍यांनी दिल्या आहेत.
 
इराणकडे मोठ्या प्रमाणात युरेनियमचा साठा आहे. त्यामुळे भविष्यात इराण सर्वात मोठा अणवस्त्र देश बनू शकतो. त्याची भिती इस्त्रायलपेक्षा अमेरिकेला जास्त आहे. अमेरिकेतील लष्करी दल व नौदलाच्या तळावर इराण हल्ला करू शकतो. हे कारण सुध्दा अमेरिकेसाठी महत्वाचे आहे. त्यामुळे अमेरिका इराण-इस्त्रायल युध्दात उडी घेतली आहे, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. इराणच्या अणुभट्ट्यांवर हल्ला करून अणवस्त्राची निर्मिती रोखता येईल, असेही अमेरिकेला वाटत असेल. इराण हा भविष्यात जगातील सर्वात मोठा अणवस्त्र देश व्हावे, हे अमेरिकेला नको आहे. त्यामुळेच इराण-इस्त्रायल युध्दासंदर्भात दोन आठवडयात निर्णय घेऊ म्हणणारा अमेरिका दोन दिवसात इराणवर हवाई हल्ले करतो. यामध्ये त्यांची भूमिका काय आहे, हे स्पष्ट होते.  
 
- माजी कर्नल अनिल आठल्ये 
 
गेल्या काही दिवसांपासून इराण-इस्त्रायलचे युध्द सुरू आहे. थांबण्याचे आजही नावही घेत नाही. सांगायचे तर, इराण हा इस्त्रायलपेक्षा बलवान देश आहे. त्याच्याकडे उद्योग, आर्थिक, मनुष्यबळ व इतर अणवस्त्रसाठा मुबलक आहे.  इराणला या युध्दात निश्चितच अमेरिकेचे सहकार्य व पाठबळ मिळाले असेल. त्याच्याशिवाय इराण हा इस्त्रायलवर हल्ला करण्याचे धाडस करू शकत नाही. अणु बॉम्बच्या निर्मितीनंतर इराण हा अमेरिकेतील लष्करी तळे उद्ववस्त करेल, अशी भितीही त्यांना आहे. तसेच, इराण येथील तेलाचे दर अमेरिकेच्या डॉलरच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. त्यामुळे अनेक देश इराणसोबत तेल आयात व्यवहार करीत आहेत. याची भितीही अमेरिकेला असणार आहे.
 
- माजी कर्नल डी.बी. शेकटकर  
 
इराण हा भविष्यात अणवस्त्र संपन्न देश असेल, याची भिती अनेक देशांना आहे. पुढे इराणकडून मोठा नरसंहार होऊ शकतो. त्यामुळे पतंप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दोन्ही देशांमध्ये शांती व्हावी, यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. इराणचे पंतप्रधानही रूस देशाच्या बैठकीसाठी गेले आहे. प्रत्येक देशाला सुरक्षित वातावरणाची गरज असते. त्यासाठी ते प्रयत्न करीत असतात. सद्य:स्थितीत युध्दाला पुर्णविरामाची गरज आहे. अमेरिकेचा हस्तक्षेप हा त्यातील एक महत्वाचा भाग असणार आहे. 
 
- माजी कर्नल वशिष्ठ
 
इराण-इस्त्रायल युध्दासंदर्भात विचार करणे काळाची गरज आहे. गेल्या नऊ ते दहा दिवसांपासून युध्द सुरू आहे. दोन्ही देशांच्या नागरी वस्तींमध्ये हल्ला होत असल्याने अनेक निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. इस्त्रायलची युध्दाची भूमिका वेगळी असली तरी या युध्दात अमेरिकेचा हस्तक्षेप बरेच काही सांगून जातो. इराण हा अमेरिकेतील डॉलरच्या तुलनेत इतर देशांना कमी दरात तेलाची आयात करीत आहे. त्यामुळे अमेरिकेच्या आर्थिक व्यवहारावर त्याचा परिणाम दिसून येतो. दुसरे महत्वाचे म्हणजे, इराणकडे युरेनियमचा साठा अधिक आहे. त्यामुळे इराण हा कधीही देशावर हल्ला करी शकतो, याची भिती अमेरिकेला आहे. यासह देशातील इतर मुस्लिम राष्ट्रांचा पाठिंबा सुध्दा इराणला आहे. अधिक दिवस युध्द लांबल्यास भारतावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. 
पेट्रोल-इंधनचे दर वाढू शकतात. 
 
- माजी कर्नल प्रसाद जोशी 
 
पुढे इराण-इस्त्रायल युध्द लांबल्यास अनेक देशांवर त्याचा परिणाम होईल. इराण हा २५ टक्के तेलाची आयात बंद करण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे निश्चितच इतर देशात तेलाच्या किमतीमध्ये वाढ होईल. भारतात ५० ते ६० दिवसांचा अतिरिक्त साठा आहे. तेलाच्या संदर्भात भारत देश हा केवळ इराणवर अवलंबून नाही. रशीयाकडून तेल आयात करत आहे. तेलाच्या किमती स्थीर ठेवण्यासाठी आपल्याकडे अनेक उपाययोजना आहेत. सरकार त्याची काळजीही घेत असते. त्यामुळे भारतात तेलाच्या किमतीचा फारसा परिणाम दिसणार नाही. यासाठी प्रत्येक देशाची नियमावली असते. त्यानुसारच किमती वाढत असतात. युध्द थांबावे, दोन्ही देशात शांती निर्माण व्हावी, अशी भूमिका भारतासह अमेरिकेची सुध्दा आहे. त्यासाठी दोन्ही देशाकडून विशेष प्रयत्न केले जात आहे. 
 
- माजी कर्नल महाजन
 

Related Articles