ज्येष्ठ पत्रकार रंगनाथ माळवे यांचे निधन   

पुणे : ज्येष्ठ पत्रकार रंगनाथ माळवे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते ८७ वयाचे होते. माळवे यांनी ‘विशालसह्याद्री’मधून पत्रकारितेची सुरूवात केली. त्यानंतर त्यांनी दीर्घकाळ ’प्रभात’मध्ये मुख्य उपसंपादक म्हणून काम पाहिले. त्यांनी अनेक सदरांचे लिखाण केले. सामाजिक क्षेत्रांतील कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ’पाठीवरील थाप पडलीच पाहिजे’ हे त्यांचे सदर विशेष गाजले. पत्रकारितेतील विशेष योगदानाबद्दल त्यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. कात्रज स्मशानभूमीत सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी राजकीय, सामाजिक व पत्रकारिता आदी विविध क्षेत्रातील ज्येष्ठ उपस्थित होते. 

Related Articles