E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
भाजपचे तत्त्वशून्य राजकारण पुन्हा चर्चेत
Samruddhi Dhayagude
24 Jun 2025
मुंबई वार्तापत्र, अभय देशपांडे
मागच्या आठवड्यात वर्धापनदिनानिमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटांचे मेळावे झाले. अपेक्षेप्रमाणे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकमेकांचे वाभाडे काढले. उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या मनसेसोबत युती करण्यासाठी सकारात्मक असल्याचे सांगितले. युती नको आणि युतीला नकार दिल्याचे पातकही आपल्यावर नको, अशी काहीशी भूमिका असलेल्या मनसेच्या नेत्यांनी सावध, पण नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या.
शिक्षण खात्याने हिंदी भाषा सक्तीबाबत आणखी एक संदिग्ध आदेश काढून शिक्षण खात्याची निर्मितीच गोंधळ घालण्यासाठी करण्यात आली असल्याचे परत एकदा सप्रमाण सिद्ध केले; पण या सगळ्यापेक्षा अधिक चर्चा झाली, ती नाशिकचे माजी महापौर सुधाकर बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाची. आता सुधाकर बडगुजर हे काही एवढे मोठे नेते नाहीत, की त्यांच्या पक्षांतराची एवढी चर्चा व्हावी; पण या निमित्ताने जगातील सर्वांत मोठा पक्ष असल्याचा टेंभा मिरविणार्या भाजपचे तत्त्वशून्य राजकारण पुन्हा एकदा चर्चेला आले.
सुरुवातीपासून वादग्रस्त असलेले सुधाकर बडगुजर नगरसेवक झाले. नंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांचे निष्ठावंत पाईक म्हणून त्यांची भरभराट झाली. नाशिक शहरातील आणि ग्रामीण भागातील अनेक निष्ठावंतांना डावलून शिवसेना नेते संजय राऊत यांनी त्यांना मोठे केले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना विधानसभेचे तिकीटही मिळाले; पण भाजपच्या सीमा हिरे यांनी त्यांचा पराभव केला. कुख्यात तस्कर व मुंबई बॉम्बस्फोटाचा मास्टरमाईंड सलीम कुत्ता पॅरोलवर तुरुंगाबाहेर असताना त्याच्या सोबत सुधाकर बडगुजर नाचत असल्याची चित्रफित बाहेर आली. भाजपचे विद्यमान मंत्री आणि तत्कालीन आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत हे प्रकरण काढले. तेव्हा तत्कालीन उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करण्याची घोषणा केली होती. ही चौकशी अजूनही संपलेली नसताना, सुधाकर बडगुजर मागच्या आठवड्यात भाजपत सामील झाले. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री गिरीश महाजन आदी ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.
बडगुजर यांना विरोध
एखाद्या नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणे, ईडी, आयकर विभागासह विविध खात्यांच्या चौकशांचा ससेमिरा मागे लावणे व नंतर त्यांना आपल्या पक्षात किंवा युतीत सहभागी व्हायला भाग पाडणे, हे भाजपचे राजकारण नवीन नाही. त्यामुळे असे काही घडले असेल, तर त्यात आश्चर्य वाटण्याचे कारण नाही; पण राज्य पातळीवरील नेत्यांसाठी वापरला जाणारा फॉर्म्युला आता बडगुजर यांच्यासारख्या महापालिका स्तरावरील नेत्यांच्या बाबतीतही लागू झाला आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. बडगुजर यांना पक्षात घेण्यास अनेकांचा विरोध होता. विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभूत करणार्या भाजप आमदार सीमा हिरे यांनी तर जाहीरपणे तशी भूमिका घेतली होती. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा यासाठी फारसे अनुकूल नव्हते म्हणे! काही वर्षांपूर्वी बावनकुळे यांचे मकाऊ येथील एक कॅसिनोमधील फोटो खा. संजय राऊत यांनी उघड करून खळबळ उडवून दिली होती. बडगुजर यांनीच हे फोटो राऊतांपर्यंत पोचवल्याची कुजबुज तेव्हा होती. भाजपच्या स्थानिक पदाधिकार्यांनी तर बडगुजर यांच्या प्रवेशाला विरोध करताना याला दुजोराच दिला; पण पक्षातील निष्ठावंत नेत्यांचा, स्थानिक पदाधिकार्यांचा विरोध धुडकावून बडगुजर यांना पक्षात सामावून घेण्यात आले. बडगुजर यांना भाजपत घेण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा आग्रह होता. त्यांनी आपली सगळी ताकद वापरली व या प्रवेशासाठी टाळाटाळ करणारे बावनकुळे वरून आदेश येताच मुकाटपणे स्वागताला आल्याची चर्चा भाजपत आहे.
ज्यांच्यावर अंडरवर्ल्डच्या कनेक्शनवरून आरोप केले, अशा बडगुजर यांना पक्षात घेतल्यावर आपल्यावर टीका होईल याची जाणीव भाजपच्या नेत्यांना नक्कीच असेल. तरीही त्याची पर्वा न करता त्यांना पक्षात घेण्यात आले. जगात सर्वाधिक सदस्य संख्या असलेल्या पक्षाला अशी काय मजबुरी होती? असा प्रश्न कोणालाही पडेल; पण निवडणूक जिंकण्यासाठी, विरोधकांना नामशेष करण्यासाठी आम्ही काहीही करू शकतो, लोकांना काय वाटते याचा आम्हाला काहीही फरक पडत नाही, अशी भाजपच्या नेत्यांची ठाम धारणा झालेली दिसते.
येणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात, विधानसभा निवडणुकीत मिळवलेले यश कायम ठेवून विरोधकांना सावरण्याची संधीच द्यायची नाही, हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विरोधकच नाही, तर आपल्या मित्रपक्षांनाही त्यांना मर्यादेपेक्षा मोठे होऊ द्यायचे नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी, आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी जो येईल त्याला पक्षात घेण्याची मोहीम भाजपने सुरू केली आहे. या मोहिमेत अनेक शहरातील अनेक बडगुजर सहभागी झालेले दिसले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.
२०२७ मध्ये नाशिकला कुंभमेळा होत आहे. त्यामुळे नाशिकच्या पालकमंत्रिपदासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अतिशय आग्रही होते; पण पूर्वीप्रमाणे पालकमंत्रिपद शिवसेनेकडेच राहील, अशी ठाम भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. परदेश दौर्यावर जाण्यापूर्वी फडणवीस यांनी घाईघाईने गिरीश महाजन यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती केली होती; पण शिंदे यांनी दिल्लीत संपर्क करून या निर्णयाला स्थगिती द्यायला लावली. अजूनही हा तिढा सुटलेला नाही. नाशिक महापालिकेत भाजपला मागच्या निवडणुकीत बर्यापैकी यश मिळाले, पण शिवसेनेचे वर्चस्व मोडून काढता आले नाही. शिवसेना फुटली असली तरी भाजपला येथे आपली ताकद वाढवता आलेली नाही. त्यामुळे कुंभमेळ्याच्या पर्वात महापालिकेवर आपली सत्ता असावी, यासाठी सध्या मेगा भरती सुरू आहे. नाशिकच नाही, तर सर्वत्र हेच धोरण आहे. एकेकाळी विरोधकांनी आरोप केले म्हणून महादेव शिवणकर, शोभाताई फडणीस यांचे राजीनामे घेऊन, चौकशी होईपर्यंत त्यांना सत्तेबाहेर ठेवण्यात आले होते. आता आपणच ज्यांच्यावर आरोप केले त्यांनाही चौकशी आधीच पक्षात आणून खांद्यावर घेण्याचे सत्र सुरू आहे. पक्षाचे हे अध:पतन जुन्या, जाणत्या नेत्यांना अस्वस्थ करत आहे. मुख्यमंत्री फडणवीस मध्यभागी बसलेले व शेजारी अजित पवार, सुनील तटकरे, अशोक चव्हाण, छगन भुजबळ बसलेले असा फोटो सध्या प्रसारित होत आहे. भाजपने पदरात घेऊन पवित्र केलेल्या लोकांची यादीही समाजमाध्यमातून प्रचंड फिरते आहे. मोदी सत्तेवर आले तेव्हा त्यांनी राजकारणात साफसफाई करण्याची ग्वाही दिली होती. हे काम त्यांनी विरोधी पक्षांपासून सुरू केलेले दिसते. विरोधी पक्षात एकही वादग्रस्त नेता राहणार हे धोरण असेल, तर विरोधकांनीही त्याचे स्वागत केले पाहिजे.
युतीचा प्रस्ताव किती मनसे?
शिवसेनेचा ठाकरे गट आणि राज ठाकरेंची महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येणार, युती करून विधानसभा निवडणूक लढवणार अशी चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे; पण आम्ही सकारात्मक आहोत, महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे तेच करू, अशा सूचक वक्तव्याचा पुढे काही हा विषय जात नाही. किंबहुना त्याला हळूहळू वेगळे फाटे फुटायला लागले आहेत. त्यामुळे युतीबाबत घातलेली साद व त्याला मिळालेला प्रतिसाद किती खरा व मनापासून आहे? याबाबतच प्रश्न निर्माण झाला आहे.
दोन महिन्यांपूर्वी राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत याबाबत सुतोवाच केल्यानंतर उद्धव ठाकरे लगेच एक पाऊल पुढे आले होते; पण नंतर दोघेही उन्हाळी सुट्टीसाठी परदेशात गेल्याने हा विषय काही पुढे सरकला नाही. परवा पक्षाच्या वर्धापन दिन मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार करताना, आम्ही सकारात्मक असल्याचे सांगितले, पण मनसे नेत्यांकडून त्याला प्रतिसाद देण्याऐवजी, १९ वर्षांनंतर अचानक प्रेम कोठून आले? आमदारांची संख्या ६० वरून २० वर आल्याने सकारात्मकता आली का? ज्यांना लोक आपल्याला का सोडून जातात, त्यांच्या मनात काय आहे? हे कळत नाही, त्यांना राज्याच्या मनातले काय कळणार? असे प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. स्वतः राज ठाकरे या विषयावर एक शब्द बोलायला तयार नाहीत. त्यांचे दुसर्या फळीतले नेते युती व्हावी या विचाराचे दिसत नाहीत. मध्यंतरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पंचतारांकित हॉटेलात राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यामुळे हा बदल झाला आहे का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
Related
Articles
ब्रिटनचे ‘एफ-३५ बी’ हेरगिरीसाठी भारतात?
01 Jul 2025
लुआन ड्रे प्रीटोरियसचे दीडशतक तर कॉर्बिन बॉशचे शतक
30 Jun 2025
पाकिस्तानात स्फोट;चार अधिकारी ठार
03 Jul 2025
तेजीच्या लाटेवर बाजार स्वार
30 Jun 2025
अन्नधान्य वाहतूकदारांचे उद्यापासून आंदोलन
01 Jul 2025
पीएमपीच्या बसथांब्यांची माहिती डिजिटल स्वरूपात लवकरच
30 Jun 2025
ब्रिटनचे ‘एफ-३५ बी’ हेरगिरीसाठी भारतात?
01 Jul 2025
लुआन ड्रे प्रीटोरियसचे दीडशतक तर कॉर्बिन बॉशचे शतक
30 Jun 2025
पाकिस्तानात स्फोट;चार अधिकारी ठार
03 Jul 2025
तेजीच्या लाटेवर बाजार स्वार
30 Jun 2025
अन्नधान्य वाहतूकदारांचे उद्यापासून आंदोलन
01 Jul 2025
पीएमपीच्या बसथांब्यांची माहिती डिजिटल स्वरूपात लवकरच
30 Jun 2025
ब्रिटनचे ‘एफ-३५ बी’ हेरगिरीसाठी भारतात?
01 Jul 2025
लुआन ड्रे प्रीटोरियसचे दीडशतक तर कॉर्बिन बॉशचे शतक
30 Jun 2025
पाकिस्तानात स्फोट;चार अधिकारी ठार
03 Jul 2025
तेजीच्या लाटेवर बाजार स्वार
30 Jun 2025
अन्नधान्य वाहतूकदारांचे उद्यापासून आंदोलन
01 Jul 2025
पीएमपीच्या बसथांब्यांची माहिती डिजिटल स्वरूपात लवकरच
30 Jun 2025
ब्रिटनचे ‘एफ-३५ बी’ हेरगिरीसाठी भारतात?
01 Jul 2025
लुआन ड्रे प्रीटोरियसचे दीडशतक तर कॉर्बिन बॉशचे शतक
30 Jun 2025
पाकिस्तानात स्फोट;चार अधिकारी ठार
03 Jul 2025
तेजीच्या लाटेवर बाजार स्वार
30 Jun 2025
अन्नधान्य वाहतूकदारांचे उद्यापासून आंदोलन
01 Jul 2025
पीएमपीच्या बसथांब्यांची माहिती डिजिटल स्वरूपात लवकरच
30 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप