बीसीए,बीबीए,बीएमएस, बीबीएम अतिरिक्त सीईटी अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ   

पुणे : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम (अतिरिक्त सीईटी) २०२५ ऑनलाईन अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ  देण्यात आली आहे. त्यानुसार, आता २७ जूनपर्यंत विद्यार्थी नोंदणी करता येणार आहे.सीईटी सेलमार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करीता तंत्रशिक्षण विभागातील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी बीसीए/बीबीए/बीएमएस/बीबीएम-सीईटी-२०२५ ही ऑनलाईन अतिरिक्त सामाईक प्रवेश परीक्षेकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. ही ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम २० जून २०२५ पर्यंत देण्यात आली होती. मात्र, आता नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. 
 
सदर परीक्षेच्या ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी उमेदवार, पालक तसेच संस्थांनी विनंती केली होती. त्याअनुषंगाने उमेदवारांचे शैक्षणिक हित लक्षात घेता मुदतवाढ देण्यात आली आहे.दरम्यान, या परीक्षेस काही उमेदवार सहभागी होऊ न शकल्यामुळे उमेदवार पालक आणि संस्था यांनी सीईटी कक्षास व्यक्तिशः आणि ईमेल द्वारे अतिरिक्त सामायिक प्रवेश परीक्षा घेण्याबाबत विनंती केली होती त्यानुसार ही परीक्षा घेण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे.

Related Articles