महिलांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन द्यावे : शरद पवार   

पुणे : महिला आज प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व दाखवत आहे. देशात, राज्यात अनेक कर्तृत्वान महिला आहेत. त्यांच्या कर्तृत्वाला कायम प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली पाहिजे. यशस्विनी हे गेल्या अनेक वर्षापासून हा दृष्टीकोन ठेऊन काम करत आहे, असे कौतुक ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केले.  
 
यशवंतराव चव्हाण सेंटर यांच्या वतीने यशस्विनी सन्मान सोहळा बालगंधर्व येथे रविवारी झाला.  त्यावेळी ते बोलत होते. या वेळी लेखक प्राजक्त देशमुख, धैर्यकन्या आसावरी जगदाळे, कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, अंकुश काकडे, रोहिणी खडसे आदि उपस्थित होते. यावेळी मनिषा सजनपवार, डॉ. शामल गरूड, कमल कुंभार, उल्का महाजन, डॉ. शबनम शेख, अलका धुपकर यांना कृषी, साहित्य, उद्योजिका, सामाजिक, क्रिडा, पत्रकारिता पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी हुंडामुक्त महाराष्ट्र, हिंसामुक्त कुटुंब या पत्रिकाचे प्रकाशन करण्यात आले.  
 
महिला धोरण आणताना अनेकांनी विरोध केला अनेक समित्या स्थापन करावा लागल्या. त्यावेळी अनेक विरोधकांना समजावून सांगावे लागलेे. वडिलांच्या मालमत्तेत मुलींना हिस्सा मिळावा हे करत असताना देखील लोकांनी विरोध केला. राज्याच्या विधानसभेत देखील मोठा विरोध होता पण सगळ्यांना समजावून सांगून हा कायदा देखील मंजूर केला गेला. पुरूषांचा काही वेळेस विरोध होतो. मात्र, समजावून सांगितल्यानंतर विरोध मावळतो. त्यामुळे पुरूषांनी ही मानसिकता बदलली पाहिजे. राज्यात हा कायदा आपण केला, महिलांना योग्य अधिकार दिले, सत्तेत देखील महिलाना समान हक्क देण्याचा कायदा देखील आपल्याच राज्यात आपण केला. देशातही महिलांच्या कायद्याचा प्रस्ताव मांडत असताना त्या कायद्याची प्रत फाडून टाकून नंतर त्याला विरोध करण्यात आला होता. आता बदल होत आहे. 

Related Articles