E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मालमत्ताधारकांसाठी सवलतीचे फक्त १० दिवसच बाकी
Wrutuja pandharpure
23 Jun 2025
१ जुलैपासून २ टक्क्यांचा विलंब दंड लागणार
पिंपरी
: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने मालमत्ता कर भरणार्यांसाठी जाहीर केलेल्या सवलती मिळविण्यासाठी आता केवळ १० दिवस बाकी आहेत. ३० जून पूर्वी ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरल्यास १० टक्के सवलत असून महिलांच्या नावावर असलेल्या एका मालमत्तेसाठी ३० टक्क्यांपर्यंत सवलत दिली जात आहे. मालमत्ताधारकांनी सदर सवलतींचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
महानगरपालिकेने ‘सिद्धी उपक्रम’ अंतर्गत महिला बचत गटांमार्फत ६ लाख ३५ हजार मालमत्ता धारकांना घरोघरी जाऊन बिलांचे वाटप केले आहे. अनेक मालमत्ता धारकांना जप्तीच्या नोटीसा देखील पाठवण्यात आल्या असून, लवकरच जप्तीची कारवाईही केली जाणार आहे. सदर मोहिमेमुळे एप्रिल ते १९ जून दरम्यान महापालिकेला ३५९ कोटी ८५ लाख रुपयांचा मालमत्ताकर संकलित झाला आहे.
दरम्यान, २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये थकबाकीदारांकडून प्राप्त झालेल्या धनादेशांपैकी न वटलेल्या धनादेशाची एकूण कराची रक्कम १० कोटी १५ लाख रुपये आहे. ज्या मालमत्ताधारकांचा धनादेश वटला नाही, अशा मालमत्ताधारकांना नोटीस देत त्यांना त्यांची रक्कम रोख व ऑनलाइन माध्यमातूनच भरावी लागेल, असे महानगरपालिकेच्या कर संकलन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
अशा आहेत सवलती
* ३० जूनपर्यंत लागू असणार्या सामान्य सवलती
* स्वातंत्र्यसैनिक किंवा पत्नीच्या नावावरच्या एका निवासी मालमत्तेस - ५० टक्के सवलत
* महिलांच्या नावावरच्या एका निवासी मालमत्तेस ३० टक्के सवलत
* ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या दिव्यांग व्यक्तीच्या एका मालमत्तेस ५० टक्के सवलत
* संंपूर्ण कराची रक्कम आगाऊ भरणार्यास ५ टक्के सवलत
खासगी शैक्षणिक संस्थांसाठी या आहेत सवलती
१) माझी मिळकत माझी आकारणी योजनेअंतर्गत नोंदणीकृत मालमत्तेस - ६९ टक्के सवलत
२) नवीन आकारणी झालेल्या मालमत्तेस - ५ टक्के सवलत
३) सलग ३ वर्षे नियमित कर भरणार्यास - २ टक्के सवलत
४) एप्रिल ते जून दरम्यान ऑनलाईन एकरकमी भरणार्यास - ५ टक्के सवलत
५) माजी सैनिक, शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांसाठी - १०० टक्के सवलत
६) इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनला - २ टक्के सवलत
Related
Articles
कन्हैया कुमार निवडणूक लढवणार
28 Jun 2025
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
03 Jul 2025
दिल्लीत जुन्या वाहनांना इंधन नाही
01 Jul 2025
थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा निलंबित
02 Jul 2025
सामाजिक सुरक्षा योजनांचा फायदा ९५ कोटी नागरिकांना : मोदी
30 Jun 2025
काटेवाडीत मेंढ्यांचे गोल रिंगण
28 Jun 2025
कन्हैया कुमार निवडणूक लढवणार
28 Jun 2025
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
03 Jul 2025
दिल्लीत जुन्या वाहनांना इंधन नाही
01 Jul 2025
थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा निलंबित
02 Jul 2025
सामाजिक सुरक्षा योजनांचा फायदा ९५ कोटी नागरिकांना : मोदी
30 Jun 2025
काटेवाडीत मेंढ्यांचे गोल रिंगण
28 Jun 2025
कन्हैया कुमार निवडणूक लढवणार
28 Jun 2025
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
03 Jul 2025
दिल्लीत जुन्या वाहनांना इंधन नाही
01 Jul 2025
थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा निलंबित
02 Jul 2025
सामाजिक सुरक्षा योजनांचा फायदा ९५ कोटी नागरिकांना : मोदी
30 Jun 2025
काटेवाडीत मेंढ्यांचे गोल रिंगण
28 Jun 2025
कन्हैया कुमार निवडणूक लढवणार
28 Jun 2025
भोंदू बाबाच्या कोठडीत वाढ
03 Jul 2025
दिल्लीत जुन्या वाहनांना इंधन नाही
01 Jul 2025
थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा निलंबित
02 Jul 2025
सामाजिक सुरक्षा योजनांचा फायदा ९५ कोटी नागरिकांना : मोदी
30 Jun 2025
काटेवाडीत मेंढ्यांचे गोल रिंगण
28 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप