पावसाळ्यात नक्षलविरोधी मोहीम सुरू राहणार   

नवी दिल्ली : पावसाळ्यात नक्षलविरोधी मोहीम सुरूच राहणार असल्याचे गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी स्पष्ट केले.प्रत्येक पावसाळ्यात जंगलातील नदी, नाले दुथडी भरुन वाहत असल्याने नक्षलवादी विश्रांती घेतात. पण, यंदा नक्षलवाद्यांना उसंत मिळणार नाही. कारण त्यांच्यावर पावसाळ्यात देखील कारवाई सुरूच राहणार आहे, असे शहा यांनी सांगितले. ३१ मार्च २०२६ पयर्र्त नक्षलवादाचे समूळ उच्चाटण करण्याचा निर्धार केंद्र सरकारने केला आहे. त्यामुळे पावसाळ्यातही नक्षलविरोधी कारवाई थांबणार नाही. ती पुढेही सुरूच राहणार आहे. नक्षलवाद्यांनी शरण यावे, शस्त्र खाली टाकावीत आणि विकासाच्या मार्गात सहभागी व्हावे, असे आवाहन शहा यांनी केले. 
 
जे शस्त्रे टाकून शरण येतील त्यांचे स्वागत केले जाईल. यापूर्वी अनेकांनी शस्त्रे टाकली आणि मुख्य प्रवाहात सामील झाले. त्यांचे पुनर्वसन करण्याची आश्वासने केंद्र आणि नक्षलग्रस्त राज्यांनी पूर्ण केली आहेत, असेही ते म्हणाले.
 

Related Articles