उत्तराधिकार्‍याची निवड ट्रस्ट आणि तिबेटच्या परंपरेप्रमाणे   

दलाई लामा यांच्याकडून स्पष्ट

धर्मशाळा : माझा उत्तराधिकारी  अर्थात १५ वे दलाई लामा  यांची निवड गॅडन फोडरंग ट्रस्ट करेल. अशी घोषणा तिबेटचे अध्यात्मिक गुरु दलाई लामा यांनी त्यांच्या ९० व्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी केली. गॅडन फोडरंग ट्रस्टची स्थापना दलाई लामा यांच्या कार्यालयाने २०१५ मध्ये केली होती. लामा यांच्या घोषणेमुळे त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल आणि तो कोण निवडणार ? हा प्रश्न निकालात निघाला आहे. 
 
१४ वे दलाई लामा तेन्झिन ग्यात्सो, ज्यांना ल्हामा थोंडुप असेही म्हणतात. त्यांनी २१ मे २०२५ रोजी केलेले विधान त्यांच्या ९० व्या वाढदिवसाच्या चार दिवस आधी बुधवारी त्यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केले. काल त्यांच्या भाषणाची ५.५७ मिनिटांची चित्रफीत प्रसारीत केली आहे. यापूर्वी त्यांनी सांगितले होते की, त्यांचा उत्तराधिकारी महिला किंवा चीनबाहेर जन्मलेला असेल तर तिबेटची सर्वात पवित्र परंपरा संपुष्टात येऊ शकते.  
 
दरम्यान, दलाई लामा यांचा ९० वा वाढदिवस साजरा करण्यासाठी धर्मशाळाजवळील  मॅकलिओडगंज येथील त्सुग्लागखांग मंदिरात ३० जूनपासून कार्यक्रम सुरू झाले आहेत. यापूर्वी लामा यांनी २०११ मध्ये सांगितले होते की माझ्या ९० व्या वाढदिवशी गॅडन फोडरंग ट्रस्ट कार्यरत राहील किंवा नाही, याचा निर्णय घेतला जाईल. आता त्यांनीच ट्रस्ट उत्तराधिकारी निवडणार असल्याचे जाहीर केल्यामुळे या संदर्भातील चर्चांना पूर्ण विराम मिळाल्याचे मानले जात आहे. 
 

Related Articles