ओली पोपच्या शतकाने इंग्लंडला सावरले   

हेडिंग्ले : बॉर्डर गावसकर चषकामध्ये जसप्रीत बुमरा एकामागून एक  फलंदाज बाद करत होता. दुसरीकडे, इतर भारतीय गोलंदाज सतत संघर्ष करत होते. आता इंग्लंड कसोटी मालिकेपूर्वी सामन्याच्या दुसर्‍या दिवशीही असेच काहीसे दिसून आले. दुसर्‍या दिवशी भारतीय संघाकडून जसप्रीत बुमराहने तीन बळी घेतल्या. दुसर्‍या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडने १० फलंदाज गमावून ४६५ धावा केल्या. पहिल्या डावात ते अजूनही ६ धावांनी मागे आहेत.  बुमराच्या अचूक आणि धारदार मार्‍यामुळे इंग्लंडला सुरुवातीलाच हादरा बसला, मात्र नंतर बेन डकेट (६२) आणि ओली पोपने (१०६) डाव सावरला. 
 
विशेष म्हणजे पोपने शतक झळकावून भारतीय गोलंदाजांची झोप उडवली. त्यानंतर मधल्या फळीतील इंग्लंडचे फलंदाज हॅरी ब्रुक याने ९९ धावा केल्या. त्याचे शतक अवघ्या १ धावेने हुकले. त्याला साथ देणारा रुट २८ धावांवर बाद झाला. त्याला बुमरा याने शानदार गोलंदाजी करत करूण नायरकडे झेलबाद केले. त्यानंतर स्टोक्स हा २० धावांवर असताना त्याला सिराज याने पंतकडे झेलबाद केले. जेमी स्मिथ याने ४० धावा केल्या. प्रसिद्ध याने साई सुदर्शनकडे त्याला झेलबाद केले. वोक्स हा ३८ धावांवर तर ब्रायडन कार्से हा २२ धावांवर बाद झाले. टँग याने ११ धावांवर असताना बुमरा याने त्याचा त्रिफळा उडविला. शोएब बशीर हा १ धावेवर नाबाद राहिला. ३४ अवांतर धावा इंग्लंडला मिळाल्या. दुसर्‍या दिवशी भारतीय संघाने ३५९/३ च्या धावसंख्येवरून पुढे खेळायला सुरुवात केली होती. शुभमन गिलने पहिल्याच दिवशी शतक पूर्ण केले होते, तर ऋषभ पंतने दुसर्‍याच दिवशी त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सातवे शतक झळकावले. यासह, पंत एमएस धोनीला मागे टाकत कसोटीत सर्वाधिक शतके करणारा भारतीय यष्टीरक्षक ठरला.
 
करुण नायर ८ वर्षांनी भारतीय संघात परतला आहे, पण तो खातेही उघडू शकला नाही. एकेकाळी भारतीय संघाने ३ बळी गमावत ४३० धावा केल्या होत्या, परंतु त्यानंतर बळींची माळ सुरू झाली आणि भारतीय पुढील ७ बळी ४१ धावांच्या आत गमावल्या. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स व्यतिरिक्त, जोश टंगने आपल्या गोलंदाजीने कहर केला. स्टोक्स आणि टंगने दोघांनीही प्रत्येकी चार बळी घेतल्या.  भारताने इंग्लंडविरुद्ध पहिल्या डावात ४७१ धावा केल्या होत्या. इंग्लंडचा संघ फलंदाजीसाठी आला, तेव्हा जसप्रीत बुमराने पहिल्याच षटकात भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले. झॅक क्रॉली फक्त ४ धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर, बेन डकेट आणि ऑली पोप यांच्यात १२२ धावांची अशी भागीदारी झाली की भारतीय गोलंदाज बळीसाठी आसुसले. अखेर २८ व्या षटकात बुमराहने भारताला ब्रेकथ्रू दिला, त्याने ६२ धावांवर डकेटला त्रिफळाबाद केले.  जसप्रीत बुमराने आणखी २ संधी निर्माण केल्या, परंतु यशस्वी जैस्वाल आणि रवींद्र जडेजा यांच्या चेंडूंवर प्रत्येकी एक झेल सोडला. प्रसिद्ध कृष्णा खूप महागडा ठरला, दुसरीकडे,  सिराजने काही संधी निर्माण केल्या, पण त्याला एकही बळी घेता आली नाही. बुमराने भारतीय संघासाठी तिन्ही बळी घेतल्या.
 
संक्षिप्त धावफलक 
 
इंग्लंड : ओली पोप १०६, डकेट ६२, क्रावली ४, रूट २८, ब्रुक ९९, स्टोक्स २०, जेमी स्मिथ ४०, वोक्स ३८, ब्रायडन कार्से २२, टंग ११, बशीर १ एकूण १००.४ षटकांत ४६५/१०

Related Articles