डेव्हिड लॉरेन्स यांचे निधन   

लंडन : इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज डेव्हिड लॉरेन्स यांचे वयाच्या ६१व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या लीड्स टेस्ट सामन्यादरम्यान दोन्ही संघांनी काळ्या पट्ट्या बांधून डेव्हिड लॉरेन्स यांना श्रद्धांजली वाहिली. क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांनी सोशल मीडियावर त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. लॉरेन्स यांच्या आठवणी नेहमी क्रिकेटप्रेमींच्या हृदयात राहतील, अशी भावना व्यक्त केली.ग्लॉस्टरशायर आणि इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज डेव्हिड लॉरेन्स यांचे वयाच्या ६१ व्या वर्षी निधन झाले आहे. क्रिकेट जगतासाठी ही एक दुःखद बातमी आहे, कारण लॉरेन्सने त्याच्या लहान पण प्रभावी कारकिर्दीत त्याच्या वेग आणि जोशाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. त्याने इंग्लंडसाठी पाच कसोटी सामने आणि एक वनडे सामने खेळले. 
 
दुखापतींमुळे त्याची आंतरराष्ट्रीय कारकीर्द कमी झाली असली तरी, त्याची प्रतिभा खास बनवत होती.डेव्हिड लॉरेन्सचा जन्म ग्लॉस्टरशायरमध्ये झाला. लॉरेन्सच्या कुटुंबाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ’आम्हाला हे कळवताना खूप दुःख होत आहे की डेव्हिड लॉरेन्स यांचे निधन झाले आहे, ते एका आजाराशी झुंजत होते. डेव्हिड लॉरेन्सने १९८८ मध्ये इंग्लंडकडून पदार्पण केले आणि १९९२ मध्ये त्यांचा शेवटचा सामना खेळला. या दरम्यान, त्यांनी ५ कसोटी सामन्यांमध्ये १८ बळी घेतले आणि एकदिवसाच्या सामन्यांमध्ये त्यांच्या नावावर ४ बळी आहेत. याशिवाय, त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये एकूण ५१५ बळी घेतले. त्याच वेळी, त्यांनी लिस्ट ए मध्ये १५५ बळी घेतले. एवढेच नाही तर २०२२ मध्ये त्यांच्या काउंटीचे ते अध्यक्ष म्हणून निवडून आले.

Related Articles