खासगी दलालांवर गुन्हे दाखल करा   

माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पोलीस प्रशासनाला सूचना

भीमाशंकर, (वार्ताहर) : श्री क्षेत्र भीमशंकर येथे खासगी दलाल अवाच्या सव्वा पैसे दर्शनासाठी येणार्‍या वाहनांकडून घेत आहेत. यामध्ये कोणी असले तरी त्याला सोडू नका, गुन्हे दाखल करा व भीमाशंकर मध्ये सुरू असलेले बेकायदा प्रकार त्वरीत थाबवा, अशा कडक सूचना पोलीस प्रशासनाला दिल्या असल्याचे माजी गृहमंत्री व आमदार दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. 
 
भीमाशंकर येथे बसस्थानकासमोर बॅरेकेट लावून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परिवारातील लोकांकडून मंदिरापर्यंत जाण्यासाठी खाजगी दलालांंनी एक हजार रूपये घेतले असल्याच्या बातम्या विविध वृत्तपत्रांमधून प्रसिध्द झाल्या होत्या. त्यावेळी मंचर येथील पत्रकार परिषदेत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या असल्याचे सांगितले. 
 
भीमाशंकर येथे काही खासगी दलालांकडून दर्शनासाठी अवाच्या सव्वा पैसे घेतले जातात तर काही खाजगी वाहतूक करणार्‍या गाड्या मंदिरापर्यंत नेण्यासाठी पैसे उकळतात. या प्रकारांमुळे देवस्थानाची व आपल्या भागाची बदनामी होत आहे. 

Related Articles