E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
फरारी आरोपीला अटक
Samruddhi Dhayagude
04 Jul 2025
पुणे : गस्तीवर असलेल्या पोलिसांवर प्रभात रस्त्यावरील बंद बंगल्यामध्ये दरोडा टाकण्यासाठी शिरलेल्या दरोडेखोरांनी हल्ला केला होता. त्यावेळी, पोलिसांनी गोळीबार केला. त्यातील, फरारी गुन्हेगारांपैकी एकाला गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने नाशिक येथून आठ महिन्यांनी अटक केली.
फिरोजखां शरीफखां दुल्होत ऊर्फ मेवाती (वय ३४, झंजाळा, अंबई, ता. सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर) असे नाशिक येथून अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. पोलीस अंमलदार महेश तांबे यांनी याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. प्रभात रस्त्यावर २२ ऑक्टोंबर २०२४ रोजी पहाटे अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला होता.
तक्रारदार महेश तांबे आणि त्यांचे सहकारी गणेश सातव यांच्यासह रात्रपाळीवर असताना गस्त घालत होते. गस्त घालत असताना, पहाटे अडीचच्या सुमारास प्रभात रोडवरील अभिनव विद्यालय पथ येथील जानकी व्हिला बंगल्यासमोर आले. तेव्हा तेथे दुचाकीवर दोघे जण थांबलेले दिसले. त्यांनी या दोघांकडे चौकशी केल्यावर त्यांनी बंद बंगल्याकडे पाहत आवाज दिला. त्याबरोबर सहा ते सात जण बाहेर आले. त्यांनी या दोघा पोलिसांवर हल्ला केला. तेव्हा तांबे यांनी आपल्याकडील पिस्तुलातून दोन गोळ्या झाडल्या. त्या दोघांच्या पायाला लागल्या होत्या. गोळीबार झाल्यावर ते पळून गेले होते. त्यातील एकाला गुन्हे शाखेने या अगोदर पकडले होते. इतर पाच गुन्हेगारांना न्यायालयाने फरार घोषित केले होते.
पोलीस अंमलदारांवर हल्ला करणारा मुख्य गुन्हेगार फिरोजखां दुल्होत हा नाशिक येथे येणार असल्याची माहिती पथकाचे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांना खबर्याकडून मिळाली. त्यावरून, पोलिसांचे पथक तातडीने नाशिकला रवाना झाले. या पथकाने भद्रकाली येथील कान्हेरेवाडीमधील बी.डी. भालेकर मैदानात सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. पुढील कारवाईसाठी त्याला डेक्कन पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहायक निरीक्षक राकेश कदम, मदन कांबळे, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, सारंग दळे, कानिफनाथ कारखेले, प्रशांत कापुरे, गिरीष नाणेकर, सुहास तांबेकर, ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषिकेश व्यवहारे, शेखर काटे, नितीन घाडगे, बाळासाहेब तनपुरे, पानसरे, नेहा तापकीर, मांदळे, नरवडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Related
Articles
पंतप्रधान मोदी यांचे मालदीवमध्ये स्वागत
26 Jul 2025
ज्येष्ठ व्यक्तीला चोरट्यांनी लुटले
24 Jul 2025
सहा महिने धान्य न घेतल्यास रेशन कार्ड रद्द?
26 Jul 2025
बांगलादेशात शाळेच्या इमारतीवर कोसळले विमान
22 Jul 2025
सरकारने विधानसभेला पत्त्याचा क्लब बनवला
24 Jul 2025
धनकवडीत २० ते २५ वाहनांची दोघांकडून तोडफोड
23 Jul 2025
पंतप्रधान मोदी यांचे मालदीवमध्ये स्वागत
26 Jul 2025
ज्येष्ठ व्यक्तीला चोरट्यांनी लुटले
24 Jul 2025
सहा महिने धान्य न घेतल्यास रेशन कार्ड रद्द?
26 Jul 2025
बांगलादेशात शाळेच्या इमारतीवर कोसळले विमान
22 Jul 2025
सरकारने विधानसभेला पत्त्याचा क्लब बनवला
24 Jul 2025
धनकवडीत २० ते २५ वाहनांची दोघांकडून तोडफोड
23 Jul 2025
पंतप्रधान मोदी यांचे मालदीवमध्ये स्वागत
26 Jul 2025
ज्येष्ठ व्यक्तीला चोरट्यांनी लुटले
24 Jul 2025
सहा महिने धान्य न घेतल्यास रेशन कार्ड रद्द?
26 Jul 2025
बांगलादेशात शाळेच्या इमारतीवर कोसळले विमान
22 Jul 2025
सरकारने विधानसभेला पत्त्याचा क्लब बनवला
24 Jul 2025
धनकवडीत २० ते २५ वाहनांची दोघांकडून तोडफोड
23 Jul 2025
पंतप्रधान मोदी यांचे मालदीवमध्ये स्वागत
26 Jul 2025
ज्येष्ठ व्यक्तीला चोरट्यांनी लुटले
24 Jul 2025
सहा महिने धान्य न घेतल्यास रेशन कार्ड रद्द?
26 Jul 2025
बांगलादेशात शाळेच्या इमारतीवर कोसळले विमान
22 Jul 2025
सरकारने विधानसभेला पत्त्याचा क्लब बनवला
24 Jul 2025
धनकवडीत २० ते २५ वाहनांची दोघांकडून तोडफोड
23 Jul 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बाजारात खोबर्याचा तुटवडा
2
अकरावी प्रवेशाची तिसरी फेरी जाहीर
3
सर्व १२ आरोपींची निर्दोष मुक्तता
4
महागाईवाढ मंदावली? (अग्रलेख)
5
‘डॉन’ चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रा बारोट यांचे निधन
6
निवडणूक आयोग म्हणजे शेंदूर फासलेला दगड