तुलसी गब्बार्ड यांच्यावर ट्रम्प भडकले   

अण्वस्त्रांबद्दल अकारण भिती पसरवत असल्याचा ठपका

वॉशिंग्टन : अण्वस्त्र युद्धाचा धोका कायम असल्याचे विधान अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संचालक तुलसी गब्बार्ड यांनी केले होते.  अण्वस्त्रांचा धोका असल्याची भीती त्या अकारण पसरवत असल्याचा आरोप डोनाल्ड टम्प यांनी करुन संताप व्यक्त केला.
 
काही दिवसांपूर्वी तुलसी गब्बार्ड यांनी जपानचा दौरा केला होता. त्या वेळी त्यांनी हिरोशिमा येथे भेट दिली होती. दुसर्‍या महायुद्धात अमेरिकेने हिरोशिमा आणि नागासाकी येथे अणुबाँब टाकले होते. त्यात लाखो नागरिकांचा मृत्यू झाला होता.  अणुबाँब जगासाठी किती धोकादायक आहे हे सांगण्यासाठी तुलसी यांनी समाज माध्यमांवर साडेतीन मिनिटांची चित्रफीत टाकली होती. त्यात त्यांनी अजूनही जग अण्वस्त्राच्या धोक्यापासून लांब नसल्याचे मत प्रकट केले होते. ही बाब नागरिकांना अकारण घाबरविण्याचा प्रकार असल्याचे मत ट्रम्प यांनी व्यक्त करुन संताप व्यक्त केला होता. जबाबदार अधिकारी पदावरील व्यक्तींना असे मत प्रकट करणे शोभत नसल्याची टीका ट्रम्प यांनी त्यांच्यावर केली. 

Related Articles