दहशतवाद्यांना निधी मिळाल्याशिवाय पहलगामसारखा हल्ला अशक्य   

‘एफएटीएफ’ने पाकिस्तानला खडसावले

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा ‘आर्थिक कृती कारवाई पथकाने’ (फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स) निषेध केला आहे. दहशतवाद्यांना निधी मिळाल्याशिवाय असा हल्ला होऊ शकत नाही, असे ‘एफएटीएफ’ने म्हटले आहे.‘एफएटीएफ’ आंतरराष्ट्रीय संस्था असून दहशतवादी संघटनांना होणार्‍या आर्थिक रसदवर तिची करडी नजर असते. या संस्थेने नुकताच एक अहवाल समोर आणला. यामध्ये ‘एफएटीएफ’ने २०२० मधील घटनेचा हवाला दिला आहे. भारतीय अधिकार्‍यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये एका गुप्त माहितीच्या आधारे पाकिस्तानमधील कराचीकडे क्षेपणास्त्रासाठी लागणारा माल एका जहाजामध्ये पकडला होता. 

Related Articles