सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत निवृत्ती वेतनात वाढ   

नितीश सरकारचा निर्णय
 
पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि विधवा महिलांच्या निवृत्तीवेतनमध्ये सातशे रुपयांची वाढ राज्य सरकारने केली आहे. जुलैपासून लाभार्थ्यांना ४०० रुपयांऐवजी ११०० रुपयांचे निवृत्तीवेतन मिळेल, असे नितीश कुमार यांनी शनिवारी सांगितले.
 
दर महिन्याच्या १० तारखेला सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात निवृत्ती वेतनाची रक्कम पाठवली जाईल, असेही ते म्हणाले.या योजनेचा राज्यातील १.९७ कोटी जनतेला लाभ होईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.ज्येष्ठ नागरिक समाजाचा महत्त्वाचा घटक असून, त्यांचे सन्माननीय आणि सुरक्षित जीवन निश्चित करणे, ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. राज्य सरकार या दिशेने सतत काम करत आहे आणि ते करत राहील, असेही नितीश यांनी म्हटले आहे. या निर्णयामुळे लाभार्थ्यांना मोठी मदत होईल आणि ते सन्मानाने जीवन जगतील, समाज कल्याण विभागाच्या सचिव बंदना प्रेयशी यांनी सांगितले.या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. निवडणुकीपूर्वी विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दल मतदारांना मोठी आश्वासने देत आहे. 

Related Articles