देशात डाळी, तेलबियांचे उत्पादन वाढले   

नवी दिल्ली : देशातील डाळी आणि तेलबियांची आयात केली जात आहे, अशी चिंता खासदारांनी संसदेच्या समितीसमोर व्यक्त केली आहे.  या उलट सरकारने स्पष्ट केले की, गेल्या दहा वर्षांत देशातंर्गत डाळी आणि तेलबियांचे उत्पादन वाढले आहे. 
 
डाळी आणि तेलबियांसाठी देशाला आयातीवर अवलंबून राहावे लागत असल्याची चिंता खासदारांनी व्यक्त केली. कृषी, पशूपालन आणि अन्न प्रक्रिये संदर्भातील स्थायी समितीसमोर आपली व्यथा खासदारांनी व्यक्त केली. त्यात म्हटले आहे की, खाद्यतेलाची देशांतर्गत मागणी २०२३ ते २०२४ साठी ५६ टक्के होती. सुमारे १५.६६ दशलक्ष तेल आयात करावे लागले.  या संदर्भात २० जून रोजी कृषी मंत्रालयाने बैठकीत सांगितले की, २०१४ ते २०१६ आणि २०२४ ते २०२५ दरम्यान खाद्यतेलांच्या बियांचे उत्पादन ५५ टक्के वाढले. 
 
तत्पूर्वी २००४ ते २००५ आणि २०१४ ते २०१५ दरम्यान ते १३ टक्के होते. पाम तेलावर भारत आयातीवर अवलंबून असून. काही खासदारांनी आरोग्यासाठी ते घातक असल्याचे निदर्शनास आणून दिले. भारत ८० हजार कोटी रुपयांचे चे खाद्यतेल आयात करतो, असेही सरकारकडून सांगण्यात आले. गेल्या वर्षातींल आकडेवारीनुसार मोहरी, शेंंगदाणे तेलाचे उत्पादन देशात पर्याप्त होते. सूर्यफुल तेलाची मागणी ३.५५ मेट्रीक टन होती. त्यामुळे आयात ३.४९ मेट्रीक टन करावी लागली. 

Related Articles