सोमेश्वर साखर कारखाना सर्वोत्कृष्ट; दिल्लीत गौरव   

सोमेश्वरनगर, (प्रतिनिधी) : बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यास राष्ट्रीय सहकारी साखर संघ यांचे वतीने  २०२३-२४ च्या गळीत हंगामासाठी संपूर्ण देशातून ऊसविकास आर्थिक व तांत्रिक या तिन्ही क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल उच्च साखर उतारा विभागातील डॉ.आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर दिल्ली येथे गुरुवारी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
 
कारखाना अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष मिलिंद कांबळे, सर्व संचालक मंडळ कार्यकारी संचालक व अधिकारी यांनी स्वीकारला. केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री  निमुबेन  बंभानीया, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांचे हस्ते करण्यात आला.
 
या पुरस्काराने जबाबदारी वाढली असून सभासद शेतकरी व सर्व घटकाच्या विकासासाठी संचालक मंडळ कटिबद्ध असल्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी पुरस्कार स्वीकारणेनंतर सांगीतले. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट चा या अगोदर चार वेळा पुरस्कार मिळाला असून राष्ट्रीय पातळीवर प्रथमतः हा पुरस्कार मिळाला असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मार्गदर्शन. सभासद शेतकरी, अधिकारी, कामगार वर्ग यांच्या सर्वांच्या प्रयत्नामुळे हा पुरस्कार मिळालेच पुरुषोत्तम जगताप यांनी सांगितले.
 

Related Articles