तीन लाखांहून अधिक प्रवाशांचा मेट्रो प्रवास   

पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या शुक्रवारी शहरात दाखल झाल्या. पालख्यांसोबत आलेल्या लाखो वारीकर्‍यांमुळे शहरातील अनेक मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे  पालख्या आगमनाच्या दिवशी रस्ते बंद असल्याने नागरिकांनी मेट्रोचा वापर केला. त्यामुळे शुक्रवारी तीन लाख प्रवाशांनी मेट्रोने प्रवास केला आहे. 
 
दररोज मेट्रोने प्रवास करणार्‍यांच्या तुलनेत शुक्रवारी दुप्पट प्रवाशांनी प्रवाशांनी प्रवास केला. मेट्रोच्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जून महिन्याच्या आकडेवारीनुसार दररोज सुमारे १.५ लाख ते १.७ लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करतात. वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड महापालिका भवन ते स्वारगेट या दोन मार्गांमध्ये वनाज-रामवाडी मार्गावर प्रवाशांची संख्या अधिक असते. शुक्रवारी पालख्या येणार असल्यामुळे पालख्या जाणार्‍या मार्गांसोबतच त्यांच्या आजूबाजूचे रस्तेही वाहतूक पोलिसांनी बंद केले होते. यामुळे खासगी वाहनांनी किंवा पीएमपीएमएल बसने प्रवास करणे अनेकांना शक्य नव्हते. पीएमपी बस सेवेवरही परिणाम झाला. अशा वेळी मेट्रो सेवा सुरळीत सुरू असल्यामुळे पुणेकरांनी मेट्रो प्रवासाला प्राधान्य दिले. 
 
दिवसभरात ५३ लाखांहून अधिक उत्पन्न
 
मेट्रोने शुक्रवारी ३ लाख १९ हजार ६६ प्रवाशांनी प्रवास केला, प्रवाशांची संख्या दुप्पटीने वाढल्यामुळे महामेट्रोला ५३ लाख १४ हजार ५२९ रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्यामध्ये वनाज ते रामवाडी मार्गावर १ लाख ६८ हजार ६८१ प्रवाशशंनी, पिंपरी-चिंचवड मनपा भवन ते स्वारगेट मार्गावर १ लाख ५० हजार ३८५ प्रवाशांनी प्रवास केला. मेट्रोच्या मध्यवर्ती स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळाली. शहरात आलेल्या वारीकर्‍यांनीही मेट्रो प्रवासाचा अनुभव घेतल्यामुळे गर्दी अधिक झाली होती.

Related Articles