E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
नीरज चोप्रा पॅरिस डायमंड लीगचा विजेता
Wrutuja pandharpure
22 Jun 2025
पॅरिस
: भारताचा अव्वल दर्जाचा भालाफेकपटू व दुहेरी ऑलिम्पिक पदक विजेता नीरज चोप्रा या ऐतिहासिक कामगिरी केली आहे. नीरजने पॅरिस डायमंड लीग २०२५ मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत ही स्पर्धा जिंकली आहे. त्याने अँडरसन पीटर्स व जूलियन वेबरसारख्या तगड्या खेळाडूंना पराभूत करत पॅरिस डायमंड लीगच्या विजेतेपदास गवसणी घातली आहे. नीरजने डायमंड लीगच्या पॅरिस फेरीत त्याची सर्वोत्तम कामगिरी केली आहे.
यंदाच्या पॅरिस डायमंड लीग स्पर्धेत जूलियन वेबरने नीरजला कडवं आव्हान दिलं होतं. मात्र, नीरजने त्याच्या पहिल्याच प्रयत्नात ८८.१६ मीटर भालाफेक करून (थ्रो) त्याचं वर्चस्व सिद्ध केलं.या थ्रोमुळे नीरज सुरुवातीपासूनच आघाडीवर होता. नीरजची आघाडी इतर कोणत्याही खेळाडूला मोडून काढता आली नाही.या विजयासह नीरजने जर्मनीचा अव्वल भालाफेकपटू जूलियन वेबरचा वचपा काढला आहे. कारण वेबरने डायमंड लीगच्या दोहा लेगमध्ये नीरजला पराभूत केलं होतं.
मात्र पॅरिसमध्ये नीरजने वेबरला मागे टाकत ही स्पर्धा जिंकली आहे.जूलियन वेबरने ८७.८८ मीटर थ्रो करून द्वितीय क्रमांक पटकावला. तर, ब्राझीलच्या लुइस मॉरिसियो दा सिल्व्हाने ८६.६२ मीटरपर्यंत भाला फेकून तिसरं स्थान पटकावलं आहे. मागील तीन स्पर्धांमध्ये पहिल्यांदाच नीरजने वेबरचा पराभव केला आहे. सध्याच्या डायमंड लीग हंगामाचा अंतिम सामना २७-२८ ऑगस्ट रोजी स्वित्झर्लंडच्या झ्युरिक शहरांत खेळवला जाईल.
दरम्यान, डायमंड लीगच्या पॅरिस लेगमध्ये नीरजचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी म्हणून ओळखला जाणार्या अँडरसन पीटर्सने सर्वांना निराश केलं. या स्पर्धेत तो त्याच्या नावाला साजेशी कामगिरी करू शकला नाही. त्याने ७७.८९ मीटरच्या थ्रोने सुरुवात केली. तसेच पाच प्रयत्नांमध्ये तो केवळ ८०.२९ मीटर लांब थ्रो करू शकला. नीरज चोप्रा आता २४ जून रोजी ओस्ट्राव्हा गोल्डन स्पाइक २०२५ अॅथलेटिक्स मीटमध्ये मैदानात उतरेल. चेक प्रजास्ताकमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यानंतर ५ जुलै रोजी बंगळुरूत आयोजित एका स्पर्धेत नीरज खेळताना दिसेल.
Related
Articles
शेअर बाजार घसरला
01 Jul 2025
चहापानावर बहिष्कार
30 Jun 2025
फिरत्या दवाखान्याला पालखी सोहळ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
28 Jun 2025
छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाचा पाया रचला : राजाराम
29 Jun 2025
उद्यापासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन
29 Jun 2025
भगवान जगन्नाथ यात्रेला प्रारंभ
27 Jun 2025
शेअर बाजार घसरला
01 Jul 2025
चहापानावर बहिष्कार
30 Jun 2025
फिरत्या दवाखान्याला पालखी सोहळ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
28 Jun 2025
छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाचा पाया रचला : राजाराम
29 Jun 2025
उद्यापासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन
29 Jun 2025
भगवान जगन्नाथ यात्रेला प्रारंभ
27 Jun 2025
शेअर बाजार घसरला
01 Jul 2025
चहापानावर बहिष्कार
30 Jun 2025
फिरत्या दवाखान्याला पालखी सोहळ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
28 Jun 2025
छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाचा पाया रचला : राजाराम
29 Jun 2025
उद्यापासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन
29 Jun 2025
भगवान जगन्नाथ यात्रेला प्रारंभ
27 Jun 2025
शेअर बाजार घसरला
01 Jul 2025
चहापानावर बहिष्कार
30 Jun 2025
फिरत्या दवाखान्याला पालखी सोहळ्यात उत्स्फूर्त प्रतिसाद
28 Jun 2025
छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाचा पाया रचला : राजाराम
29 Jun 2025
उद्यापासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन
29 Jun 2025
भगवान जगन्नाथ यात्रेला प्रारंभ
27 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
नुसत्याच चर्चा! (अग्रलेख)
2
शुभांशूंची अभिमानास्पद भरारी
3
आणीबाणी : तेव्हाची आणि आताची
4
केरळचा आदर्श
5
युद्धाचा दोन्ही देशांना फटका
6
सोलापूरचे माजी महापौर मनोहर सपाटेंवर विनयभंगाचे आरोप