चीनची विमाने शस्त्रांसह तेहरानमध्ये   

तेहरान : इस्रायल आणि इराणमधील लष्करी संघर्षास आठ दिवसांचा कालावधी लोटला आहे. उभय देशांतील युद्धात अमेरिका थेट उतरणार की नाही, याचा निर्णय दोन आठवडे लांबला असला तरी चीनची विमाने शस्त्रास्त्रांसह तेहरानमध्ये दाखल झाली आहेत. चीन आणि रशिया इराणच्या बाजूने असल्याचे आधीच स्पष्ट झाले आहे. तर, अमेरिका इस्रायलच्या पाठीशी उभा आहे. एकंदरितच, आगामी काळात युद्धाची व्याप्ती अधिक वाढणार असल्याचे दिसत आहे.
 
गेल्या काही दिवसांत तीन चिनी मालवाहू विमाने इराणमध्ये पोहोचली आहेत. या विमानांचा मार्ग शांघायहून लक्झेंबर्गला होता. परंतु, हवेत असतानाच या विमानांनी त्यांचे ट्रान्सपॉन्डर आणि सेन्सर बंद करुन इराणच्या हवाई हद्दीत प्रवेश केला. विशेष म्हणजे, युद्धामुळे इराणची हवाई हद्द बंद होती, अशा परिस्थितीत चिनी विमानांना प्रवेश कसा मिळाला? असा प्रश्न विचारला जात आहे. तसेच, चीनने इराणला शस्त्र किंवा हवाई संरक्षण प्रणाली पुरवली आहे का? असा अंदाज बांधला जात आहे.

Related Articles