तीनही आरोपींना महाविद्यालयातून काढले   

कोलकात्यातील अत्याचार

कोलकाता : विधी महाविद्यालयातील सामूहिक अत्याचार प्रकरणातील तीनही आरोपींना संस्थेतून काढून टाकले आहे, असे एका अधिकार्‍याने मंगळवारी सांगितले. यामध्ये महाविद्यालयातील कंत्राटी कर्मचारी असलेला मुख्य आरोपी मोनोजित मिश्रा आणि जैब अहमद (१९), प्रमित मुखर्जी (२०) यांचा समावेश आहे. मिश्रा हा महाविद्यालयातील माजी विद्यार्थी असून अन्य याच महाविद्यालयात शिक्षण घेत होते. या तिघांनाही १ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तृणमूल काँग्रेसचे आमदार अशोक कुमार देब यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या महाविद्यालयाच्या प्रशासकीय मंडळाच्या बैठकीत मिश्रा याची सेवा रद्द करण्याचा आणि इतर दोन विद्यार्थ्यांना निलंबित करण्याचा निर्णय झाला.

Related Articles