वर्‍हाडाच्या मोटारीला अपघात; नऊ प्रवाशांचा मृत्यू   

पुरुलिया : पश्चिम बंगालमधील राष्ट्रीय महामार्ग १८ वर पुरुलिया जिल्ह्यात  शुक्रवारी सकाळी मोटार आणि मालमोटार यांच्यात भीषण अपघात झाला. त्यात नऊ जणांचा मृत्यू झाला.बलरामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नामशोल गावात सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मोटार आणि मालमोटार यांच्यात समोरासमोर धडक झाली होती. मोटारीतील नऊजणांचा मृत्यू झाला, अशी माहिती अधिकारी सौम्यदीप मल्लिक यांनी दिली. 
 
सर्व जण पुरुलिया जिल्ह्यातील अदाबना गावातून ते  झारखंड राज्यातील तिलातिंड येथे गेले होते. विवाह सोहळ्यानंतर ते परतत होते. तेव्हा अपघात झाला. अपघातात मोटारीचा चेंदामेंदा झाला. स्थानिक आणि आपत्ती प्रतिक्रिया दलाचे सदस्य घटनास्थळी धावले. जखमींना जवळच्या उपाचार केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी सर्वांचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. मोटार आणि मालमोटार वेगात होती. चालकांच्या निष्काळजी-पणामुळे अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Related Articles