सिसोदिया यांची तीन तास चौकशी   

नवी दिल्ली : सरकारी शाळांमधील वर्गखोल्यांच्या बांधकामाशी संबंधित कथित भ्रष्टाचार प्रकरणात दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) तीन तासांहून अधिक काळ चौकशी केली.
 
या प्रकरणात एसीबीने आम आदमी पक्षाचे नते सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना समन्स बजावले होते. जैन ६ जून रोजी एसीबीसमोर हजर झाले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सहपोलिस आयुक्त मधुर वर्मा यांनी सिसोदिया यांना काल सकाळी ११ वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार, ते कार्यालयात हजर झाले. त्यावेळी एसीबीने सिसोदिया यांची चौकशी करतानाच त्यांचा जबाब नोंदवून घेतला. सुमारे साडेतीन तास सिसोदिया एसीबीच्या कार्यालयात होते. 

Related Articles