नीरा खोर्‍यात १३ टीएमसी पाणीसाठा   

भोर, (प्रतिनीधी) : मागील आठवडाभरात नीरा खोर्‍यातील दुर्गम डोंगर भागात झालेल्या दमदार पावसामुळे चारही धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झपाट्याने पाणीसाठा वाढल्याचे समोर आले आहे. नीरा साखळी खोर्‍यात भाटघर, नीरा देवघर, गुंजवणी, वीर धरणाचा समावेश होतो. शुक्रवारी सकाळी ६ वाजता भाटघर, नीरा देवघर, गुंजवणी, वीर धरणांमध्ये एकूण १३.६२१ म्हणजेच २८.१८ टक्के पाणीसाठा झाला आहे. मागील वर्षी याच दिवशी या धरणात केवळ ४.६८४ म्हणजेच ९.६९ टक्के पाणीसाठा होता हे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट होते. यावर्षी हा पाणीसाठा तिपटीने अधिक आहे. शुक्रवारी सकाळ अखेर भाटघर ४८ मिमी पावसाची नोंद झाली. ३.३८४ टीएमसी पाणीसाठी असून धरणात १२१४ क्युसेक्सने नवीन पाणी येत आहे.
 
नीरा उजवा व डावा कालव्याचे तालुका निहाय लाभक्षेत्र
 
नीरा डाव्या कालव्यावर पुणे जिल्ह्यातील ३७०७० हेक्टर तर उजव्या कालव्यावर सातारा व सोलापूर जिल्ह्यातील ६५५०६ हेक्टर असे नीरा प्रणालीवर पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील एकूण १०२५७६ हेक्टर प्रकल्पीय सिंचन क्षेत्र आहे. तालुका निहाय डाव्या कालव्यावर पुरंदर (४२० हे.), बारामती (१३७८० हे.), इंदापूर (२२८७० हे.)तर उजव्या कालव्यावर खंडाळा (१०६ हे.), फलटण (२२१५८ हे.), माळसिरस (३२२३६ हे.), पंढऱपूर (५६५६ हे.), सांगोला (२३५० हे.) इतके आहे.

Related Articles