मुंबई, (प्रतिनिधी) : शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापनदिन मेळाव्यात मनसेसोबतच्या युतीबाबत सकारात्मक संकेत दिले आहेत. मात्र, मनसे अजूनही सावध भूमिकेत असून, जोवर ठोस प्रस्ताव येत नाही तोवर याबाबत काहीही होणार नाही, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले. महाराष्ट्राच्या मनात आहे ते करू, असे मोघम बोलून उपयोग नाही. महाआघाडी करताना, शरद पवार तसेच काँग्रेससोबत जाताना कधी शिवसैनिकांना, लोकांना विचारले होते का? आमदारांची संख्या साठवरून २० वर आल्याने सकारात्मक झालात का ? असा उपरोधिक सवाल त्यांनी केला. युतीसाठी मनसेवर दबावाचे राजकारण करू नका, मनसे अध्यक्ष राज ठाकरे याबाबत योग्य तो निर्णय घेतील, असेही देशपांडे यांनी स्पष्ट केले.
Fans
Followers