विद्यापीठ पदवी प्रदान सोहळा; प्रमाणपत्रासाठी १४ ऑगस्टपर्यंत मुदत   

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२६वा पदवी प्रदान कार्यक्रम सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये होणार आहे. पदवी, पदविका, पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. त्यासाठी १ जुलै ते १४ ऑगस्ट या कालावधीत नियमित शुल्कासह, तर १५ ते ३१ ऑगस्ट या कालावधीत विलंब शुल्कासह अर्ज भरता येणार आहेच, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांनी परिपत्रकाद्वारे दिली. १२६ व्या पदवी प्रदान कार्यक्रमात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ आणि एप्रिल-मे २०२५ मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना, तसेच दूरस्थ अभ्यासक्रमाच्या ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ मध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी, पदविका, पदव्युत्तर प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. प्रमाणपत्रासाठी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना http://www.unipune.ac.in या संकेतस्थळाद्वारे अर्ज करून शुल्क भरता येणार आहे. अर्जासह मूळ गुणपत्रिका सादर करणे आवश्यक असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२४ पूर्वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी, दुय्यम पदवी-पदविका प्रमाणपत्र अर्जासह शुल्क भरण्याचा दुवा कायमस्वरूपी सुरू आहे. 

Related Articles