निर्देशांकाची उसळी   

मुंबई : मध्य पूर्वेतील तणाव कमी होण्याचे संकेत मिळताच शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक शुक्रवारी १.२९ टक्के म्हणजे १,०४६.३० अंकांनी वाढून ८२,४०८.१७ वर स्थिरावला. तर, राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १.२९ टक्के म्हणजे ३१९.१५ अंकांनी वाढून २५,११२.४० वर पोहोचला. मागील तीन दिवसांपासून शेअर बाजारात निरुत्साह होता. गुंतवणूदारांकडून विक्रीचा मारा सुरु होता. पण, काल चित्र बदलले. वित्तीय आणि दूरसंचार क्षेत्रातील समभागात काल वाढ झाली. काल सत्राअंतर्गत व्यवहाराता निर्देशांक १.३९ टक्के म्हणजे १,१३२.६२ अंकांनी वाढून ८२,४९४.४९ वर पोहोचला होता. मात्र, दिवसअखेर काहीसा खाली आला. काल बीएसईवरील २,४६३ समभाग वधारले. तर, १,४८४ समभाग घरसले आणि १४७ समभाग स्थिर राहिले.

Related Articles