अमेरिका युद्धात उतरल्यास विध्वंस अटळ : खामेनी   

तेहरान : इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेच्या एन्ट्रीमुळे संपूर्ण जगाचे लक्ष मध्य पूर्वेकडे वेधले गेले. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बिनशर्त आत्मसमर्पणाच्या धमकीला उत्तर देताना म्हटले आहे की, अमेरिका युद्धात उतरल्यास त्यांचा विध्वंस अटळ आहे. इराण हार मानणार नाही. लादलेली शांतता किंवा युद्धही स्वीकारणार नाही.डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला बिनशर्त आत्मसमर्पण करण्यास सांगितले होते.  अमेरिकेला इराणच्या सर्वोच्च नेत्याचे स्थान माहीत आहे. आम्ही सध्या त्यांच्यावर हल्ला करणार नाही; परंतु आमचा संयम हळूहळू संपत आहे, अशी धमकी ट्रम्प यांनी दिली होती.त्यावर खामेनी म्हणाले, ज्यांना इराण आणि त्याचा इतिहास माहीत आहे, ते कधीही धमक्या देणार नाहीत. इराणी नागरिक शरण जाणारे नाहीत. ट्रम्प यांनी अशा धमक्या आम्हाला देऊ नयेत. अमेरिकन सैन्याने कोणत्याही प्रकारचा हल्ला केला तर त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. इराण लादलेली शांतता किंवा युद्ध स्वीकारणार नाही.
 
दरम्यान, बुधवारी रात्री उशिरा ट्रम्प म्हणाले होते की, मी इराणच्या अणुतळांवर हल्ला करेन किंवा नाही, याबाबत कोणालाही माहिती नाही. खामेन यांचा ठावठिकाणाही आम्हाला माहिती आहे; पण आम्ही हल्ला करणार नाही.
 

Related Articles