न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांना हटविण्याची शिफारस   

नवी दिल्ली : उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांना पदावरुन हटविण्याची शिफारस चौकशी समितीने केली आहे. या चौकशी अहवालात गैरवर्तन सिद्ध झाले असल्याचे नमूद आहे.
वर्मा यांच्या घरामध्ये अर्धवट जळालेल्या नोटा आढळल्या होत्या. त्यानंतर, मोठी खळबळ उडाली होती. या घटनेच्या चौकशीसाठी सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि हरयाना उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शील नागू यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यांची समिती स्थापन केली होती. 
 
या समितीने दहा दिवसांत ५५ साक्षीदारांची चौकशी केली. तसेच, वर्मा यांचा जबाब नोंदवला. त्यानंतर, ६४ पानांचा अहवाल तयार केला. या समितीने दिल्ली उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश आणि अलाहाबाद उच्च न्यायालयात विद्यमान न्यायाधीश वर्मा यांच्या निवासस्थानी लागलेल्या आगीच्या ठिकाणी भेट दिली होती. १४ मार्च रोजी रात्री ११.३५ च्या सुमारास ही घटना घडली होती.

Related Articles