मनसेसोबतच्या युतीबाबत जनतेच्या मनात तेच होईल   

उद्धव ठाकरे यांच्याकडून संकेत

मुंबई, (प्रतिनिधी) : गद्दारांना हाताशी धरून शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड महाराष्ट्रातून पुसून टाकण्याचा प्रयत्न केला तर भाजपचे नामोनिशाण या महाराष्ट्रातून पुसून टाकू, असा इशारा शिवसेना (ठाकरे) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी पक्षाच्या वर्धापनदिन सोहळ्यात बोलताना दिला. मनसे सोबतच्या युतीबाबत बोलताना जे शिवसैनिकांच्या मनात आहे, जे राज्याच्या मनात आहे तेच मी करेन, असे सांगत त्यांनी युतीचे संकेत दिले. मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकांचे नोकर, त्यांचे नोकर कामाला लागले आहेत. मुंबई जर मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर मालकाच्या मित्राचे काय होणार ही चिंता यांना सतावत आहे, अशी टीका त्यांनी केली.
 
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा ५९ वा वर्धापनदिन षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री नितेश राणे यांच्यावर उद्धव यांनी चौफेर टीकास्त्र सोडले. 

Related Articles