E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
पराभवानंतर नजमुल हुसेन शांतो याने कर्णधारपद सोडले
Wrutuja pandharpure
29 Jun 2025
कोलंबो
: श्रीलंकेविरुद्धच्या पराभवानंतर बांगलादेशच्या संघाला काही क्षणातच आणखी एक मोठा धक्का बसला आहे. दुसर्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर नजमुल हुसेन शांतो याने कर्णधारपद सोडले आहे. त्याने घेतलेला हा निर्णय क्रिकेट चाहत्यांना आश्चर्यचकित करून सोडणारा आहे.गाले कसोटी सामन्यात शांतोनं पहिल्या डावात १४८ आणि दुसर्या डावात नाबाद १२५ धावांच्या खेळीसह इतिहास रचला होता. एका कसोटी सामन्यातील दोन्ही डावात शतक झलकवणारा तो पहिला बांगलादेशी कॅप्टन आहे.
संघाचे नेतृत्व करताना फलंदाजीतील कर्तृत्व दाखवून देताना खास पराक्रम केल्यावर तो कॅप्टन्सी सोडेल, असा विचारही कुणी केला नव्हता. पण दुसर्या सामन्यातील पराभव अन् मालिका गमावल्याची गोष्ट त्याच्या चांगलीच जिव्हारी लागल्याचे दिसते.वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत खेळवण्यात येणार्या श्रीलंका विरुद्ध बांगलादेश यांच्यातील द्विपक्षीय कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला होता. पण दुसर्या सामन्यात यजमान श्रीलंकेनं संघाने बांगलादेशला एक डाव आणि ७८ धावांनी पराभूत केले.
या विजयासह श्रीलंकेच्या संघानं २ सामन्यांची कसोटी मालिका १-० अशी आपल्या नावे केली. पहिल्या सामन्यात फलंदाजीत धमक दाखवणार्या शांतोला दुसर्या डावात लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. सामन्यानंतर काही वेळातच त्याने कसोटी संघाचे कर्णधार पद सोडले. हा बांगलादेशच्या संघाला एक मोठा धक्काच आहे.
दुसर्या कसोटी सामन्याबद्दल बोलायचं तर बांगलादेशच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना पहिल्या डावात २४७ धावा केल्या होत्या. त्यानंतर श्रीलंकेच्या संघाने पथुम निसंका याचे शानदार शतक आणि चंडीमल आणि कुसल मेंडिसच्या अर्धशतकाच्या जोरावर पहिल्या डावात ४५८ धावांचा डोंगर उभारला होता.या धावसंखेचा पाठलाग करताना श्रीलंकन फिरकीपटू प्रभात जयसूर्यानं आपल्या फिरकीतील जादू दाखवून दिली. त्याने अर्धा संघ तंबूत धाडला. परिणामी बांगलादेशचा संघ दुसर्या डावात १३३ धावांत ऑल आउट झाला.
Related
Articles
डीजे बंदीचा आदेश सार्वजनिक मिरवणुकांनाही लागू
25 Jul 2025
कर्नाटकातील कोट्यवधींच्या गैरव्यवहाराची सीआयडी चौकशी
23 Jul 2025
वाचक लिहितात
24 Jul 2025
जेजुरी गडावर प्रसादाच्या दुकानाला आग
19 Jul 2025
तर भाजपला विचारुनच राष्ट्रवादीचे विलीनीकरण
20 Jul 2025
कोकाटे यांची हकालपट्टी करण्याची हिम्मत मुख्यमंत्र्यांमध्ये नाही का?

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बहुपेडी व्यक्तिमत्व हरपले
2
महाग घरांना मागणी
3
पावसाचा चिंताजनक आकृतीबंध
4
ट्रम्प यांना मस्क यांचे आव्हान
5
बाजारात खोबर्याचा तुटवडा
6
इंदूरने आघाडी राखली (अग्रलेख)