हिंदी सक्ती फडणवीस-राज यांचे साटेलोटे : पटोले   

मुंबई, (प्रतिनिधी) : राज्यात अनेक ज्वलंत प्रश्न असताना त्याकडे दुर्लक्ष व्हावे, यासाठी हिंदी भाषेचा वाद जाणीवपूर्वक बाहेर काढण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसेचे  अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतरच हिंदी भाषेचा शासन निर्णय  कसा आला? असा सवाल करताना, या कारस्थानामागे  फडणवीस आणि  राज ठाकरे यांची मिलीभगत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी गुरुवारी केला.
 
अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकर्‍यांकडून कर्जमाफीची मागणी केली जात आहे. लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याची मागणी  होत आहे. बेरोजगारी आणि  महागाई प्रचंड आहे. जनतेत सरकारविरोधात प्रचंड रोष आहे.  यासाठी हिंदी भाषेचा वाद जाणीवपूर्वक बाहेर काढण्यात आला. यामागे राजकारण असून फडणवीस आणि  राज ठाकरे या दोघांनाही विद्यार्थी, शिक्षण आणि भाषा याबद्दल काहीही देणेघेणे नाही. 

Related Articles