व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या   

सावंतवाडी : सावंतवाडी सालईवाडा येथील व्यावसायिकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.प्रसाद कोल्ड्रिंक्सचे मालक प्रसाद सुभाष पडते (वय ४२) यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. घटनेने सावंतवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 
 
पडते यांचे घर गेल्या दोन दिवसांपासून बंद होते. बुधवारी घराच्या दरवाजातून मोठ्या प्रमाणात रक्त बाहेर येताना शेजार्‍यांना दिसले, ज्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. तात्काळ याची माहिती पोलिसांना देण्यात आली.सावंतवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि परिसरातील रहिवासी दत्ताराम पडते यांच्या मदतीने घराचा दरवाजा उघडण्यात आला. त्यावेळी प्रसाद पडते यांनी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. 
 
पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील तपासणीसाठी तो रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक संजय कातिवले, हवालदार महेश जाधव, अनिल धुरी, निलेश नाईक आणि सचिन चव्हाण यांनी घटनास्थळी पुढील कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले.  
 

Related Articles